The news is by your side.

‘राम्या’च्या खुर्चीत बसून ‘सुन्या’ची दुकानदारी!  – ‘धूर्त’ महिला कर्मचारी बनली बळीचा बकरा!  – अकोला जिल्हा परिषदेतील खळबळजनक प्रकार

0 445

अकोला प्रतिनिधी१९ऑक्टो: अकोल्याची जिल्हा परिषद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता एका वेगळ्याच प्रकरणी जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग भलताच चर्चेत आला आहे. या बांधकाम विभागातील ‘राम्या’ची मूर्तिजापूरला बदली झाली असल्याने तो तीन दिवस मूर्तिजापुरात आणि तीन दिवस अकोल्यात असतो. बांधकाम विभागातच कार्यरत असलेला ‘सुन्या’ची शिक्षण विभागात बदलीने आस्थापना झालेली असतानाही आपला विभाग सोडून तो बांधकाम विभागात ‘राम्या’च्या खुर्चीवर बसून दुकानदारी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर आता त्या दोघांचीही खाते चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सुन्या’ आणि ‘राम्या’ पूर्वी बांधकाम विभागातच अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ‘राम्या’ची मूर्तिजापूरला पंचायत समितीत तर ‘सुन्या’ची शिक्षण विभागात बदली झाली. ‘राम्या’ला तीन दिवस मूर्तिजापुरात आणि तीन दिवस अकोल्यात जि.प. बांधकाम विभागातच प्रतिनियुक्तीने काम करण्याची मुभा मिळाली परंतु ‘सुन्या’ला पुन्हा बांधकाम विभागात बदली मिळाली नाही परंतु ‘राम्या’च्या ‘मेहेर’बानीने त्याने बांधकाम विभागात आपले बस्तान मांडले आहे. तेथे कार्यरत असलेली ‘धूर्त’ महिला कनिष्ठ सहायक हिला व्यवस्थित काम जमत नसल्याची संधी साधून ‘राम्या’ आणि ‘सुन्या’ या दोघांनी आस्थापनाच्या टेबलाचा अभ्यास करून बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती घेत यांनी स्वतः मुंबई येथे जावून १५० ते २०० पदांची पदोन्नती करून आणि नंतर रिक्त होणाऱ्या पदांची जाहिरात काढून, त्यामध्ये अर्जदाराकडून मोठ्या प्रमाणावर माया जमा करून ‘धूर्त’ महिलेला चांगलेच अडचणीत आणताना तिचे अनैतिक संबंध असल्याचा शोध लावीत तिच्या कामामध्ये हस्तक्षेप करून त्यांना अनेक संवर्गाच्या १०० बिंदू नामावली तयार करून दिल्याचे समजते. पदोन्नती व सरळ सेवेचा १५० ते २०० पदांचा अनुशेष त्यांनी काढला असून, त्या बिंदुनामावलीला मागासवर्ग कक्ष, आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्याकडून तपासणी करून घेणे आवश्यक असल्यामुळे ‘सुन्या’ने ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त शोधीत ‘धूर्त’ महिलेला सोबत घेत अमरावती गाठून १०० बिंदूनामावलीचा प्रस्ताव अमरावती येथे सादर केला. अकोल्याला परत येताना ‘सुन्या’ने ‘धूर्त’ महिलेसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केल्याची जि.प. वर्तुळात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा रंगली आहे.’राम्या’ आणि ‘सुन्या’ या दोघांनी बांधकाम विभागातील १५० ते २०० रिक्त असलेल्या व रिक्त होणाऱ्या पदांबाबत घेत ज्यांची पदोन्नती आहे अशा तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून फार मोठ्या प्रमाणात जवळपास ५० ते ६० लाख रूपये जमविल्याचे बोलले जात आहे. पदोन्नतीची जाहिरात काढल्यानंतर अनेक सुशिक्षीत बेरोजगार यांच्याकडून या ‘जोडगोळी’ने ८० ते ९० लाख रूपये आगाऊमध्ये जाहिरात निघण्यापुर्वी, पदोन्नती होण्यापूर्वी व बिंदूनामावली मंजुर होण्यापुर्वीच जमा करून ठेवल्याचेही बोलले जात आहे. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या साथीमुळे बिंदू नामावली मंजुरीचे काम प्रलंबित राहिले. या कालावधीत ‘धूर्त’ महिलेने आपले संपूर्ण लक्ष त्यांच्या बहिणीच्या मुलासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करण्याकडेच लावल्याचे हेरून ‘राम्या’ आणि ‘सुन्या’ यांनी या महिलेला बळीचा बकरा बनवून आपले काम साधून घेतले आणि राज्यपाल, मुंबई यांना या महिलेकडून सदरचे कामकाज काढून घेतल्याचा अहवाल पाठवून या गंभीर प्रकरणात शहरातच वास्तव्यास असलेल्या दोघांनी केलेली २४ फेब्रुवारी २०२० ची तक्रार कार्यालयाच्या स्तरावर बंद केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपाल, मुंबई यांना अहवालही पाठविला. परंतु प्रत्यक्षात ‘राम्या’ आणि ‘सुन्या’ या दोघांचा बांधकाम विभागातील आस्थापनेच्या टेबलशी संबंध नसताना त्यांनी वारेमाप माया जमा करण्याचा सपाटा सुरूच ठेवला असल्याने त्यांची खाते चौकशी सुरू करावी व ‘राम्या’ अधीक्षक असताना त्याला वरिष्ठ सहायकाच्या निविदा कक्षात काम का दिले, याचीही खाते चौकशी सुरू करावी, त्याची बांधकाम विभागामधील आठवड्यातून तीन दिवस असलेली प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करावी आणि तशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.अकोला यांना देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. ‘धूर्त’ महिलेला पती असूनही ती पती नसल्याचे सांगत आपल्याच जवळच्या नात्यातील वयाने लहान मुलाशी अनैतिक संबंध ठेवत आहे. ती सकाळी कार्यालयीन वेळेत न येता ११.३० ते १२.०० वाजता येते, मस्टरवर सही करून लगेच निघूनही जाते. त्यासाठी बांधकाम विभागातीलच अधीक्षक महिला तिला मदत करीत असल्याचेही समजते. त्यामुळे या ‘धूर्त’ महिलेच्या खाते चौकशीचीही मागणी केली जात आहे. अधीक्षक महिलेचेही अनेकांसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे तीदेखील ‘धूर्त’ महिलेसारखीच वागत आहे. कार्यालयात कोणत्याही प्रकारचे कामकाज करीत नाही. तिला वरिष्ठ सहाय्यक मदत करीत असल्याने त्यांचीही खाते चौकशी सुरू करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अधीक्षक महिलेची बदली शिक्षण विभाग (प्राथमिक) जि.प.अकोला येथे करावी, ‘सुन्या’ची बदली बांधकाम विभाग येथे करावी, ‘धूर्त’ महिलेच्या जागेवर इतरांना घेवून तिला बांधकाम विभागातील आवक जावक विभागाचे काम देण्यात यावे. ही कार्यवाही २८/१२/२०२० पूर्वी करावी अन्यथा आपण २८/१२/२०२० रोजी सकाळी ११ वाजता आपल्या मुंबई येथील राजभवनासमोर आत्मदहन करेल व सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.अकोला हे जवाबदार राहतील, अशी मागणी शिरसाट नामक तक्रारदाराने राज्यपाल, मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याने जि.प. वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.