The news is by your side.

भाजपा नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स

0 3

राजस्थानमधील प्रतापगडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका समारंभाचा आहे ज्यात एक भाजपा नेता एका महिला डान्सरबरोबर अश्लील प्रकारचे नृत्य आणि क्रिया करताना दिसतो आहे. भाजपाच्या त्या विभागाील ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष असलेले कैलास गुर्जर यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या गुर्जर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. परंतु उद्या होणाऱ्या प्रतापगढ नगर परिषदेच्या निवडणुकीआधी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.

“मी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे हा प्रकार घडला. ते माझं वैयक्तिक आयुष्य आहे. त्या कार्यक्रमाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. काही लोक मुद्दाम त्या व्हिडीओचा वापर करून माझी प्रतिमा मलीन करत आहेत”, असं स्पष्टीकरण गुर्जर यांनी दिलं आहे. तर भाजपाचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनीही हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असून प्रकरण नक्की काय आहे ते उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
२३ नोव्हेंबरला राजस्थानच्या निंबाहेडा-मांगलोर या ठिकाणी हा प्रकार घडला. याबाबत बोलताना गुर्जर यांनी सांगितले आहे की मी माझ्या कुटुंबासोबत नृत्य करत होतो. तो आमच्या परिवाराचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होता. माझा डान्स अनेकांनी रेकॉर्ड केला. बहुतांश लोकांनी या डान्सकडे वाईट नजरेने पाहिले नाही. पण काही लोक मुद्दाम या व्हिडीओचा वापर माझ्याविरोधात करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, काँग्रेसकडून त्यांच्यावर आरोप केला जात आहे की गुर्जर बार गर्ल्ससोबत डान्स अश्लील नृत्य करत होते.