The news is by your side.

राहुल गांधी यांचा विदेश दौरा

0 19

‘मोदींशी दोन हात करू शकणारा एकमेव भारतीय नेता’ अशी प्रतिमा बनवण्यासा’ी राहुल आपल्या विदेश दौNयांचा वापर करत आहेत आणि त्यांचा उपयोग होत आहे असे दिसत आहे. गेल्या चार वर्षातील सरकारच्या यशापयशाचा समाचार घेत आपण ‘पप्पू’ नाही असा संदेश राहुल देत आहेत.राहुल गांधी यांचा विदेश दौरा सध्या खूप गाजतो आहे. कोणी म्हणतो चांगल्यारितीने तर कोणी म्हणतो वाईटरितीने. भाजपच्या चष्म्यातून बघितले तर राहुल काहीच ‘ीक करत नाहीत. तर काँग्रेसवाले म्हणतात त्यांचे पक्षाध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप-संघाला टोल्यावर टोले हाणत आहेत. मोदींचा पुरता कचरा करत आहेत. भाजपचे नेतृत्व त्यामुळे हैराण झाले आहे याचा पुरावा म्हणजे संबित पात्रा यांच्यासारखे आक्रस्ताळी प्रवक्ते हे दररोज राहुल यांच्या दाNयावर कडवट भाष्य करत आहेत. राहुल यांना नेता बनवण्यात मोदींचा सहभाग आहे तो असा. नेपोलियन नेहमी म्हणायचा तुमचा शत्रू जर चुका करत असेल तर त्याला चुका करू द्या. त्याबाबत बोलून तुम्ही त्याला सावध करू नका. युद्धशास्त्राचा हा साधा पण महत्त्वपूर्ण नियम राजकारणाला तंतोतंत लागू आहे. पण मोदींचे काय आहे? त्यांना आपल्याशिवाय कोणाला प्रसिद्धी मिळालेली आवडत नाही. मोदींना मो’े दाखवायचे असेल तर त्यांचा प्रतिस्पर्धी ‘छोटा’ दाखवला पाहिजे. ‘पप्पू’ दाखवला पाहिजे हे ओघानेच आले. अडचणीची दुसरी गोष्ट म्हणजे प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांवर मोदी फारसा प्रहार करत नाहीत. कारण प्रादेशिक पक्षांचा जीवच छोटा. त्यांच्यावर झोड उ’वून उलट त्यांनाच फायदा मिळणार. अखिलेश यादव यांना कोणी तामिळनाडूत ओळखत नाही तर एम. के. स्टालिन हे नाव उत्तर प्रदेशात ‘ाऊक नाही. चंद्राबाबू नायडू कधीकाळी किंगमेकर होते खरे पण काही काळ तर ते आंध्रमध्येच गायब राहिले. मायावतींचे नेतृत्व साNया देशभर माहीत असले तरी त्यांनी स्वत:ला फक्त उत्तर प्रदेशातच कोंडून घेतले. अशावेळी पालापाचोळा झालेल्या काँग्रेसला आणि त्याच्या नेतृत्वाला रात्रंदिवस शिव्यांच्या लाखोल्या वाहात स्वत:ला मो’े भासवण्याचा कार्यक्रम मोदींनी राबवला. आपल्या परदेश दौNयाचा वापरदेखील काँग्रेसच्या नावाने खडे फोडण्यात करून पंतप्रधानांनी एक वादग्रस्त पायंडा पाडला.जशास तसेआता लोकसभा निवडणूक ७-८ महिन्यांवर आलेली असताना मोदींचा फुगा पंक्चर करायला राहुल स्वतःच्या विदेशी दौNयाचा वापर करत आहेत. पंतप्रधानांनी विदेश दौNयांमध्ये स्वत:ची प्रतिमा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील एकमेव लोकोत्तर नेता अशी करायचा प्रयत्न केला होता. आंतरराष्ट्रीय पटलावरचा एकमेव भारतीय नेता, कणखर नेता अशी प्रतिमा बनवण्यासा’ी सत्तर वर्षात भारतात काहीच झाले नाही हे सांगणे भाग होते. तसा दावा करणे भाग होते. आता ‘गुरुची विद्या गुरुला फळली’ या न्यायाने राहुल पंतप्रधानांची बाजी त्यांच्यावरच उलटवत आहेत. त्यात ते कितपत यशस्वी होतील अथवा सपशेल अपयशी ‘रतील ते काळच दाखवेल. २०१९ मध्ये मोदी परत पंतप्रधान बनणार ही जवळजवळ काळय़ा दगडावरची रेघ आहे असे २०१७ साली सांगणारे अर्थतज्ञ रुचिर शर्मा आता बदलले आहेत. मोदींचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे हे अर्थतज्ञ आहेत. पुढील वषी मोदी परत पंतप्रधान बनण्याची संधी ९९ टक्क्मयावरून आता ५० टक्के एवढी खाली घसरली आहे असे ते सांगत आहेत. शर्मा यांची आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय अर्थ-राजकारणावरील भाकिते ही लक्षणीय राहिलेली आहेत. विरोधी पक्षांनी ज्याप्रकारे एकत्र येण्याचा कार्यक्रम जोरदारपणे सुरू केला आहे त्यामुळे मोदी दिवसेंदिवस जास्त अडचणीत येऊ लागले आहेत असे शर्मांचे मत आहे. राहुल यांचे हे विदेश दौरे हे ‘’ोशास ‘ोसा’ प्रत्युत्तर देण्याकरता फक्त नाहीत. राहुल गांधी हे मोदींना एकमेव पर्याय आहेत असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदेश देण्याची रणनीति या दौNयामागे आहे. ‘मोदींशी दोन हात करू शकणारा एकमेव भारतीय नेता’ अशी प्रतिमा बनवण्यासा’ी राहुल या दौNयांचा वापर करत आहेत आणि त्यांचा उपयोग होत आहे असे दिसत आहे. मोदी आणि मोदी समर्थकांच्या तोंडी सदा राहुलचेच नाव असते. त्याचा फायदा देखील काँग्रेस अध्यक्षांना होत आहे. एकविसाव्या शतकात मार्केटिंगचा जमाना अजूनच प्रभावी झालेला आहे. ‘तुमचा ब्रँड मजबूत तरच तुम्ही मजबूत’ हे प्रत्येक नेत्याला कळले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी ब्रँड चमकल्याने भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. आता मोदी ब्रँडला खाली खेचण्यासा’ी गेल्या चार वर्षातील सरकारच्या यशापयशाचा समाचार घेत आपण ‘पप्पू’ नाही असा संदेश राहुल देत आहेत.राहुलसारखे परदेश दौरे प्रादेशिक नेते काढू शकत नाहीत कारण त्यांची अथवा त्यांच्या पक्षाची साधी ओळखदेखील देशाबाहेर नाही. ‘आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार आहोत’ असे प्रत्यक्षपणे न सांगता येती निवडणूक ही मोदी विरुद्ध राहुल आहे असे आंतरराष्ट्रीय ‘आखाडय़ा’त भासवण्याचा काँग्रेसी डाव यशस्वी होत आहे हे नक्की. राफेल फायटर जेट प्रकरणात अनिल अंबानी यांनी कायदेशीर नोटीसा बजावून तसेच मानहानीचे दावे ‘ोकून देखील काँग्रेसी कचरलेले नाहीत. याचा अर्थ हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळणार आहे. हे मोदी अथवा भाजपच्या हिताचे नाही. येत्या आ’वड्यात चेन्नई येथे करुणानिधींच्या स्मृतीप्रीत्यर्थ होत असलेल्या एका समारंभात दस्तुरखुद्द अमित शहा भाजपचे प्रतिनिधित्व करणार आहेत अशी वृत्ते आहेत. याचा अर्थ म्हणजे भाजप नवीन मित्रपक्षांचा शोध अजूनही सोडत नाही असा होतो. लोकसभेची येती लढाई ही कोणते रूप घेते त्याचा अंदाज मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालांवरून वर्षाअखेरपर्यंत येणार आहे. सध्या भाजपचे आडाखे चुकत आहेत त्याचा अंदाज ज्याप्रकारे राज्यपाल नियुक्त्या झालेल्या आहेत त्यावरून होत आहे. विशेषतः सत्यपाल मलिक यांची जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल म्हणून झालेल्या नेमणुकीने जुनेजाणते भाजपाई देखील हैराण झालेले आहेत. मलिक हे २५ वर्षापूर्वी खासदार होते आणि त्यानंतर त्यांच्या खात्याला फारसे राजकीय काम नसताना त्यांची महत्त्वाच्या राज्यांना झालेली ही नेमणूक म्हणून बुचकळय़ात टाकणारी आहे. गेल्या ५० वर्षात जम्मू आणि काश्मीरला राजकीय नेता राज्यपाल राहिलेला नाही. अशावेळी हा माकडाच्या हाती कोलीत देण्याचा प्रकार आहे असे भाजपच्या एका गटाला वाटते. पूरग्रस्त केरळला परकीय मदत प्रश्नावरून जे वादंग माजले त्याने भाजपचे भले झालेले नाही हे सांगण्यासा’ी ज्योतिषाची गरज नाही.