The news is by your side.

देशात ४४ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

0 2

देशात केवळ १९ दिवसांमध्ये जवळपास ४४ लाख, ४९ हजार ५५२ लाभार्थ्यांना कोविड-१९ लस टोचण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली.

केवळ १८ दिवसांमध्ये ४० लाख लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेतली, प्रत्येक दिवशी लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

केवळ २४ तासांत तीन लाख, १० हजार ६०४ जणांचे एकूण आठ हजार ४१ सत्रांमध्ये लसीकरण करण्यात आले, आतापर्यंत ८४ हजार ६१७ सत्रे आयोजित करण्यात आली, असेही सांगण्यात आले. आतापर्यंत एक कोटी, चार लाख, ८० हजार ४५५ जण करोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.१३ टक्क्य़ांवर गेले आहे.