The news is by your side.

मोदींवर टीका केल्याने काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गेंना धमकी

0 2

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने आपल्याला धमकी मिळाल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान शेतकरी आंदोलनावरुन सुरु असलेल्या टीकेला उत्तर देत पहिल्यांदाच भाष्य केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधत टोला लगावला. मल्लिकार्जून खर्गे यांनी यानंतर पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केली. त्यानंतर ही धमकी मिळाली असा आरोप त्यांनी केला आहे.

काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणारी व्यक्ती पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर संतापली होती. मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींच्या राज्यसभेतील भाषणानंतर विजय चौक येथे पत्रकार परिषद घेत टीका केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणारी व्यक्ती वारंवार तुम्ही मोदींवर टीका का करत आहात? अशी विचारणा करत होते.