The news is by your side.

मुर्तिजापूर शहरात४०किलो गांजा जप्त!

0 2

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई!

मूर्तिजापूर : १७मार्च रोजीमूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या, मौलीपुरा भागातून४०किलो गांजा, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने जप्त केला. एवढ्या मोठया प्रमाणात गांजा जप्त केल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दैनिक राजयोन्नतीचे मूर्तिजापूर तालुक्याचे प्रतिनिधी  यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या पथकाने,मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौलिपुरा जुनी वस्ती मूर्तिजापूर येथे रहिवासी असलेला अब्दुल राजीक अब्दुल  रफिक याच्या राहत्या घराची १७मार्च रोजी रात्री८वाजता दरम्यान झडती घेतली असता,त्याच्या घरातून ३लाख रुपये किंमतीचा४०किलो गांजाजप्त करण्यात आला. यावरून अब्दुल राजीक अब्दुल रफिक याच्या विरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात नारगोटीस कायदा कलम २०ब नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.एवढया मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आल्याने,मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील आणि त्यांच्या चमूने केली आहे.