The news is by your side.

पंचायत समिती आवारात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

0 34

विद्यमान सदस्यासह कर्मचाऱ्यांची दुचाकी लंपास_


अकोला :

शहर व ग्रामिण भागातुन दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना मागिल कित्येक दिवसांपासून घडत आहेत. दुचाकी चोरीला जाण्याच्या प्रकाराला पोलिस मात्र आळा लावु शकली नसल्याचे दिसते. चक्क आता अकोला पंचायत समिती आवारातुनच दुचाक्या चोरीला जात असल्याच्या घटना घडत असुन याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.विद्यमान पंचायत समिती सदस्य भास्करराव अंभोरे यांची MH 30 AL 3884 क्रमांकाची एच.एफ.डिलक्स मोटारसायकल पंचायत समिती आवारातुन चोरीला गेली असल्याने पंचायत समितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात आतापर्यंत पं.स.आवारातुन चार ते पाच मोटारसायकल चोरीला गेल्या असल्याची माहिती असुन याकडे मात्र पोलिस ठाण्यात तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी चौकशी करण्यात दिरंगाई करित असल्याचा आरोपच आता तक्रारदार करित आहेत.सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी वाहतूकदारांना घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांतील बहुतांश चोरटे पोलिसांना सापडलेच नाहीत, चोरटेच सापडत नसल्याने चोरीस गेलेल्या दुचाक्यांचा शोध लागत नाही. अकोला पंचायत समिती आवारात व बाहेर नेहमी वर्दड असल्याने हँन्डल लाॅक असलेल्या दुचाक्या क्षणातच लंपास केल्या जातात. त्यामुळे पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मोबाईल चोरीच्या घटनासारख्या दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांना चोरटे का सापडत नाहीत असा संतप्त सवाल आता नागरिकांकडुन विचारला जाऊ लागला आहे. आपली चोरीला गेलेली दुचाकी परत मिळविण्यासाठी नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. 

पंचायत समिती आवारात सी.सी.कॅमेरा  नाही

अकोला पंचायत समिती आवारात नेहमी नागरिकांची वर्दळ असल्याने आवारात दुचाक्यासुद्धा बऱ्याच उभ्या असतात. संपुर्ण आवारात मात्र एकच सुरक्षा रक्षक असल्याने दुचाक्यांची सुरक्षा करण्यात त्याला नाकीनऊ येते. सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी पंचायत समितीच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी वारंवार केली परंतु या मागणीकडे कोणीही लक्ष न दिल्याने नागरिकांसह अधिकारी-कर्मचारी व विद्यमान सदस्यांच्या दुचाक्या चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत. आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.