The news is by your side.

मनपाच्या फिरत्या वाहन पथकाव्दारे स्वॅब संकलन; विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले उद्घाटन

0 2

अकोला: कोरोनाचा संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी महानगर पालिकाच्या फिरत्या वाहन पथकाद्वारे जिल्ह्यातील विविध ठिकाणी जावून नागरिकांचे कोविड चाचणी नमुने संकलन करण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी फिरते पथक वाहनाचे फित कापून उद्घाटन केले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपाचे आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपाचे उपायुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार आदी उपस्थित होते.
 कोरोना विषाणूचा फैलाव कमी व्हावा यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढविणे आवश्यक असून त्याकरीता महानगरपालिकाच्या फिरत्या वाहनाव्दारे जिल्ह्यातील चारही झोनमधील गर्दिच्या ठिकाणी तसेच कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव असलेल्या ठिकाणी जावून लोकांचे स्वॅब संकलन करणार आहे. जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.