The news is by your side.

५७हजाराचा प्रतिबंदीत गुटका जप्त!

0 3

अकोला उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या पथकाची कारवाई!

अकोला :२०मार्च रोजी अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सराफा किराणा बाजार आणि रजपूत पुरा या दोन ठिकाणाहून५७हजार२००रुपयांचा प्रतिबंदीत गुटका जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाने केली.सूत्रांकडून मिळालेल्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सराफा किराणा बाजारातील, अक्षय चमन अग्रवाल, युवराज घनश्याम अग्रवाल,रा.रजपूत पुरा अकोला, यांच्या दुकानांतून राज्यात प्रतिबंदीत असलेल्या तंबाखूजन्य वेगवेगळ्या कंपनीचा ५७हजार२००रुपये किंमतीचा गुटका जप्त करण्यात आला. याप्रकरणी अक्षय अग्रवाल आणि युवराज अग्रवाल यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भादवी कलम,१८८,२६९,२७०,२७२,२७३ तसेच अन्न सुरक्षा कायदा कलम२६(२)(४)५९(१)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.