The news is by your side.

खंडणीवीर अनिल देशमुख यांचा त्वरित राजीनामा घ्या – आ.रणधीर सावरकर

0 3


घडलेल्या प्रकारच्या विरोधात स्थानिक ओपन थियेटर चौकात भाजप तर्फे निदर्शने

अकोला- १०० कोटी खंडणी वसुली करणाऱ्या व पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचे महापाप करणाऱ्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन या प्रकरणाची केंद्रीय एजन्सी व किंवा न्यायालयात देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी व महाराष्ट्राच्या इतिहासात काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या उद्धव ठाकरे सरकार चा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने स्थानिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह जय प्रकाश नारायण चौक येथे जिल्हा भाजपा अध्यक्ष आ.रणधीर सावरकर,ज्येष्ठ आ.गोवर्धन शर्मा,महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्राच्या इतिहासात काळिमा फासणारे कृत्य आघाडी सरकार करत असून महाजनादेश सत्तेत प्राप्त प्रत्येक बाबतीत भ्रष्टाचार भेदभाव करणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध आज करण्यात आला. यावेळी अनिल देशमुख यांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ.रणधीर सावरकर,आ.गोवर्धन शर्मा,महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल,महापौर अर्चना ताई मसने,प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात,डॉ.किशोर मालोकार,राहुल देशमुख,डॉ.विनोद बोर्डे,अक्षय गंगाखेडकर,जयंत मसने,व्यंकट ढोरे,गिरीश जोशी,संजय बडोणे,राजेंद्र गिरी,संतोष पांडे, विकी ठाकूर,ऍड.देवाशिष काकड, निलेश निनोरे,उमेश गुजर,अंबादास उमाळे,जस्मीत सिंह ओबेरॉय,ऍड.नितीन गवळी, धनंजय धबाले,अश्विनीताई हातवळणे,चंदाताई शर्मा,अभिमन्यू नळकांडे,महादेव मानकरी,अतुल अग्रवाल,मंगेश चिखले,सागर बोर्डे,संजय गोडफोडे,अजय शर्मा,विजय इंगळे,तुषार भिरड,महेंद्रसिंग राजपूत,रणजीत खेडकर,अतुल अग्रवाल,अक्षय जोशी यांचे सह आदी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.