The news is by your side.

कोरोना काळात गुटखा माफियची मोठ्या प्रमाणत कमाई

0 3

पोलिस प्रशासन यांना आळा घालण्यात कमी पडत आहे की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा

अकोट :कोरोनाच्या काळात सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना ‘बुरे दिन’चा सामना करण्याची वेळ आलेली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र कधी नव्हे असे ‘अच्छे दिन’ बघायला मिळाले आहेत. लॉकडाउनच्या काळातही चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री धडाक्यात सुरू असून, या गोरखधंद्यास आळा घालण्यास पोलिस व औषध प्रशासन कमी पडले आहे. गुटखा माफियांसोबतच या दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमाई होत असल्याची चर्चा आहे.
कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनसह संचारबंदी लागू आहे. या काळात संपूर्ण उद्योग व्यवसाय ठप्प झालेले आहेत. जिल्हाधिकारी यांनी काही प्रमाणात सूट दिली असून, काही अंशी उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने काही दिवसांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, लॉकडाउनच्या काळात सर्वच छोटे-मोठे उद्योग बंद असताना गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची चोरट्या मार्गाने वाहतूक व विक्री सर्रास सुरूच होती. यामुळे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मात्र आर्थिक भरभराट झाली. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांतून रात्रीत गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विना नंबर प्लेट असलेल्या वाहनातून माल पाठविला जात आहे.लॉक डाऊन मध्ये सर्व अवैध धंदे नावालाच बंद होते.नेमके प्रशासन या कडे दुर्लक्ष तर करीत नाही नाअसा प्रश्न नागरिकांना पडत आहे.