The news is by your side.

वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांची आत्महत्या;उपवनसंरक्षक शिवकुमार गजाआड!

0 7

महिला सक्षमीकरण की खच्चीकरण?


अमरावती /नरेंद्र बेलसरे 
महिला सबलीकरणाच्या नावाखाली गाजावाजा करणाऱ्या या शासनामध्ये महिला कर्मचारी, महिला अधिकारी संपूर्ण असुरक्षित असल्याचे वास्तव  समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील  मेळघाट मधील गुगामल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण या डॅशिंग अधिकारी महिलेने स्वतःच्या रिवाल्वर वरून छातीवर गोळी झाडून आत्महत्या केली. या महिला अधिकाऱ्यांच्या मृत्युने महाराष्ट्राचे वनक्षेत्र हादरले आहे. या महिला अधिकाऱ्यांच्या मृत्यू मागे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रमुख संचालक श्रीनिवास रेड्डी व उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे दोन अधिकारी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. चार पानाच्या सुसाईड नोटमध्ये दीपालीने आपली आपबिती कथन केली असून या दोन्ही नराधमाना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असा एकच अर्थ तिच्या लिहिण्यातून समोर येतो. विनोद शिव कुमार नावाचा हा भामटा  रात्री-बेरात्री जंगलातून सेल्फी पाठविण्याचा दीपालीला आग्रह करीत होता. रात्री एक –  दोन वाजता गस्तीवर जाण्याचे  निर्देश हा शिवकुमार देत होता. याच  शिवकुमार ला पाठीशी घालण्याचे काम व्याघ्र प्रकल्प संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी केले. त्यामुळे दोघांनाही या गुन्ह्यात आरोपी करून अटक झाली पाहिजे अशी मागणी समोर येत आहे.श्रीनिवास रेड्डी यांना वाचवण्यासाठी त्यांची तात्काळ बदली करण्यात आली. मात्र एवढी शिक्षा पुरेशी नसून त्याने दिपाली चव्हाणांच्या एकाही तक्रारीची दखल न घेतल्यामुळे विनोद शिवकुमार नावाचा उपवनसंरक्षक  मस्तावला होता. याच्या जाचाला कंटाळून दीपालीने हे जग सोडण्याचा निर्णय घेतला. शिवकुमार आणि रेड्डी हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी परप्रांतीय असून महाराष्ट्रात येऊन मराठी अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम हे अधिकारी करत आले. दोघानाही भररस्त्यात ठेचून  काढा,  अशी मागणी आणि संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण मेळघाटात उमटत आहे. मूळची सातारा जिल्ह्यातील दीपाली चव्हाण ने  वनसेवा आयोगाची 2014 ची परीक्षा उत्तीर्ण करून आर एफ ओ  पदी नियुक्ती मिळवली होती.  मात्र तिच्या नशिबी काम करण्याऐवजी स्वतःवर गोळी झाडून जीव देण्याची वेळ आली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्तेत अनेक विकृत मनोवृत्तीचे वरिष्ठ अधिकारी आजही कार्यरत आहे.अशा असंख्य दिपाली त्यांच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. मात्र नोकरी जाण्याच्या भीतीने कोणीही तक्रार करीत नाही.आज दीपाली चव्हाण हिने जे टोकाचे पाऊल उचलले ते चुकीचे आहे मात्र स्वतः मरण्याऐवजी विनोद शिवकुमार नावाचा उपवनसंरक्षक  तिने गोळी झाडून  मारून टाकला असता तर आज महाराष्ट्रभर तिचं कौतुक झालं असतं हे मात्र तेवढेच सत्य आहे. दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा हा वृत्तांत…….
अमरावती  जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल  राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत RFO दिपाली चव्हाण या (३०) वर्षीय तरूण  अधिकारी महिलेने शासकीय निवास स्थानी  गोळी झाडून आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली हे सदर पत्रातुन दिसून येते. या घटनेला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या “त्या” हरामखोर अधिकाऱ्यांमुळे शासनात काम करणाऱ्या लाखो महिलांची इभ्रत चव्हाटयावर आली आहे.  ही घटना म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र राज्याला काळीमा फासनारी ठरली आहे. नुकतेच व्हाट्सप  आणि फेसबुक ला व्हायरल झालेले पत्र प्रचंड धक्का देणारे आहे. त्या पत्रात तीला झालेल्या सर्व त्रासा विषयी तीने आपल्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले होते. वेळीच त्यांनी हस्तक्षेप केला असता तर आज दिपाली जीवंत राहिली असती. मात्र तसे झाले नाही.   हुशार तरूणी दिपाली चव्हाण लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाली. सामान्य कुटुंबातील ही तरुणी अधिकारी झाल्याने सर्वच स्तरावरून तिचे कौतुक झाले. तिचे सत्कारही झाले.  पहिलीच पोस्टिंग मेळघाटमध्ये ती पण अतिदुर्गम मागासलेल्या भागात मिळाली.  पहिल्या नियुक्तिच ठिकाण म्हणजे धुळघाट. नावातच सर्व काही आहे. जिथे माणस कामे करायला घाबरतात तिथे ही तरूण मुलगी आपली कर्तव्याची अमिट छाप उमटवते. तीच्या कामाची चर्चा होते, त्यातून तीला प्रोत्साहन मिळते. रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडते त्यातुन तीला “लेडी सिंघम” म्हणून नवी ओळख मिळते. असे दीपाली चे वर्णन करता येईल.  दीपाली चव्हाण यांच्याकडे हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालुर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती. माणसांना लाजवेल अशीच तीची काहीशी कामगिरी होती. पण तीच्या कर्तबगारीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर लागली. अधिकाऱ्यांनी तिला प्रोत्साहन देण्याऐवजी तिचे खाच्चिकरण सुरू केले. तीची वेळोवेळी मुस्कटदाबी केली. अपमान केला. तरी  हा अन्याय ती मुक़ाट्याने सहन करत होती.  मॄत्युपूर्वी तीने लिहून ठेवलेली चिट्ठी वाचली की तीव्र संताप येतो. एवढी भयानक ही घटना  अमानुषतेचा जनु काही कळस गाठला असच वाटते. दीपाली गर्भवती असतांना सुध्दा शिवकुमार नावाच्या काळाकुट्ट अधिकारी त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हता.  या राक्षसरुपी शिवकुमार नामक  अधिकाऱ्याने  तीला मालूर येथे कच्चा रस्त्यातून पायी फिरवले. ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. याचवेळी या भामट्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता.  पगार रोखण्याची धमकी, निलंबित करण्याची धमकी, रात्री बेरात्री कॉल, गावकऱ्या समोर अपमान, श्रीनिवास रेड्डी हा शिवकुमार ची करीत असलेली पाठराखण यामुळे दीपाली हतबल झाली होती. जीव देण्याशिवाय तिच्याकडे पर्याय होते. या दोन्ही  अधिकाऱ्यांना यमसदनी पाठवणे अत्यंत गरजेचे होते.मात्र तसे न करता तिने स्वतःला संपविले.  शासन सेवेतील काही परप्रांतीय  अधिकारी इंग्रज मनोवृत्तीचे आहेत.   आणखी वन विभागातील दिपाली सारख्या किती तरुनींना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागेल काय, अशी भीती व्यक्त होत आहे.   नुकतेच 8 मार्चला जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अन त्याच महिन्यात एक 28 वर्षाची तरूण RFO गोळी घालून आत्महत्या करते ही लाजीरवानी गोष्ट आहे. या अधिकाऱ्यांना निलंबित नव्हे बडतर्फ केले पाहिजे. त्यांच्या विरुध्द खटला चालवून त्यांना कठोर  शिक्षा दिली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तीला न्याय मिळेल अन्यथा दिपालीसारख्या किती तरी कर्तबगार अधिकाऱ्यांना महाराष्ट्र मुकनार आहे, याचा विचार केला गेला पाहिजे.  दिपालीला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग, SID, CID,  NIA, ATS, CBI, UAPA कायदा, एनसीबी ( Narcotics Control Bureau Mumbai) आदि यंत्रणा सरकारने कामाला लावल्या तरच दीपाली ला न्याय मिळेल आणि महिलांच्या वाटेला कोणताही अधिकारी जाणार नाही त्यासाठी राज्यातील महिला संघटनांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. हरिसाल येथे रूजू झाल्यापासुन तीच्या मोबाईलचे सर्व रेकॉर्ड (CDR डाटा) तापसले गेले पाहिजे. तेव्हा कुठे दिपालीचा बळी घेणारे हाती लागतील. अपेक्षा एवढीच आहे की तीला न्याय मिळावा दूसर म्हणजे अशी वेळ वन विभागातील ईतर कोणत्याही “दिपाली” वर येवू नये. *वनखात्यात लेडी सिंघम म्हणून ओळख*वनखात्यात लेडी सिंघम म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या दीपाली चव्हाण यांचा डॅशिंग पणा अधिकाऱ्यांना खपत नव्हता. दीपालीचा वरिष्ठ अधिकारी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यावर राजकीय वरदहस्त आणि रेड्डीची मेहरबानी असल्यामुळे तो माजला होता. एक महिला अधिकारी डॅशिंग काम करत असताना हा अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत होता. त्यामुळे दीपालीला वेळोवेळी अपमान सहन करावा लागला. बाहेरून लेडी सिंघम म्हणून ओळख असणारी दिपाली आतून कमालीची हादरली होती. आपले अधिकारीच आपला छळ करतात यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते असे तिला वाटायचे. आपल्या  शासन व्यवस्थेत नोकरी ही किती टोकाची मजबुरी आहे,हे या घटनेतून जाणवते.दीपाली चव्हाण ची अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. छेडछाडीला,लैंगिक अत्याचाराला,बदनामीला,त्रासाला कंटाळून अनेक स्त्रियानी आत्महत्या केली आहे. दीपालीने स्विकाललेला हा मार्ग चुकीचा आहे.तुझ्या मृत्यूने गेंड्याच्या कातडीची ही व्यवस्था  बदलणार नाही…. प्रत्येक स्त्रीला बदलावं लागेल.ते कृतीतून दाखवावे लागेल..अत्याचार करणाऱ्याला ती संपवू शकते,हे अहंकारी पुरूषी व्यवस्थेसमोर आणावं लागेल.ही लढाई अवघड आहे.पण ती लढावीच लागेल.
*दीपाली च्या आत्महत्येने अनेकांना शॉक*संपूर्ण वनविभागाला हादरवून सोडणारी घटना, आज दिपालीच्या जाण्यानं वनविभागात महिला मनाने पार खचून गेल्या आहेत. आपले वरिष्ठ अधिकारीच या कटात सहभागी असल्यामुळे वन खात्यात नोकरी करायची की नाही असा प्रश्न अनेक तरुणीपुढे उभा झाला आहे.वन खात्यामध्ये अशी किती रेड्डी आणि शिवकुमार भरले असतील याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे.*माझी मुलगी परत द्या – शकुंतला चव्हाण*दिपाली चव्हाण जाई शकुंतला चव्हाण हिने माझी मुलगी मला परत द्या किंवा त्या दोन  अधिकाऱ्यांना फासावर लटकवा अशी मागणी केली आहे. दीपालीने सर्विस रिवाल्वर मधून छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. धारणी पोलिसांनी दिपाली चा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती येथील रुग्णालयात पाठवला. शव विच्छेदन होईपर्यंत शकुंतला बाई चव्हाण अतिशय विव्हळत होत्या.मुलीवर ही वेळ आली नसती असा तिचा सुरू होता. *खा. नवनीतराणा चर्चेत*…दीपाली चव्हाण च्या मृत्यूनंतर अनेक राजकीय लोकप्रतिनिधी चर्चेत आले. त्यामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे नाव आहे. अधिकाऱ्याच्या छळ बाबत तक्रार केली होती.मात्र श्रीनिवास रेड्डी आणि उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका न घेतल्यामुळे दीपालीचा जीव गेला असा आरोप होत आहे. मेळघाट आणि चिखलदरा या दोन्ही तालुक्याच्या सहकार्याने राणा बाई लोकसभेत पोहचल्या हे विशेष. या दोन्हीअधिकाऱ्यांना आता सोडणार नाही अशी रोखठोक भूमिका खासदार नवनीत राणा यांनी घेतली असली तरी देवाघरी गेलेली दीपाली मात्र परत येणार नाही.   *पळून जाताना पकडला शिवकुमार*उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या दीपाली चव्हाण प्रकरणी धारणी पोलिसांनी अपराध क्रमांक 211/2021 कलम 306 नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी शिवकुमार कर्नाटक राज्यात आपल्या मूळगावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागपूर रेल्वे स्टेशन वर पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी पोलिसांनी त्याला चांगला चोप दिला. मै अधिकारी हु… बडा अधिकारी हू…. असे तो पोलिसांना सांगत होता. मात्र  पोलिसांनी त्याच्या कानाखाली आवाज काढल्यामुळे तो सरळ पोलीस जीपमध्ये जावून बसला.     *श्रीनिवास रेड्डी रडारवर*.आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला सहकार्य करणारा मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालक श्रीनिवास रेड्डी आता पोलिसांच्या रडारवर आहे. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणात रेड्डी यांना आरोपी करा अशी मागणी विविध राजकीय पक्षाच्या संघटनांनी केल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची संकेत मिळत आहेत. दीपाली चव्हाण च्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की *तुम्ही तुमच्या ifs उपवनसंरक्षक ची बाजू घेणार आहात, हे मला माहीत होते*. … यामुळे श्रीनिवास रेड्डी सहआरोपी बनू शकतात असा निष्कर्ष विधी क्षेत्रातील जाणकारांनी काढला. दीपाली चा रेड्डी वर सुध्दा विश्वास नव्हता. हे चिठ्ठी वाचल्यानंतर समजते. दीपालीला न्याय मिळावा अशी मागणी समस्त मेळघाट वासियांंनी केली आहे.