The news is by your side.

गिट्टी खदान हत्याकांडातील आरोपी लखन राठोड याचा जामीन मंजूर

0 6

अकोला-महानगरातील बहुचर्चित बोरगाव मंजू मार्गावरील गिट्टीखदान येथील हत्याकांडातील आरोपीला  न्यायालयाने नुकताच सशर्त जामीन मंजूर केला.बोरगाव मंजू येथील गिट्टीखदानचे व्यवस्थापक गोपाल अग्रवाल यांची अपमानास्पद वागणुकीच्या पार्शवभूमीवर दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती.औद्योगिक वसाहतीतील अप्पू पुतळ्याजवळ घडलेल्या या थरारक हत्याकांडाने संपूर्ण अकोला शहर ढवळून निघाले होते.यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी भादवि ३०२,३९४,३४,201,212,120,120 बी तथा आर्म एक्ट 3,25,5,27(1),27(3),7 अन्वये गुन्हा नोंदवून यातील सहा आरोपीना अटक करून एक फरार एक आरोपीचा शोध घेणे सुरु केले.यातील आरोपी लखन वसंता राठोड याच्या जमानतीसाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश न्याय.विवेक गव्हाणे यांच्या न्यायालयात आरोपीचे वकिल एड.रितेश वर्मा यांनी अर्ज सादर केला. जमानतीच्या संदर्भात दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर विद्यमान न्यायालयाने गोपाल अग्रवाल हत्याकांडातील आरोपी लखन वसंता राठोड याचा सशर्त जामीन मंजूर केला.आरोपी लखन वसंता राठोड यांची बाजू एड.रितेश वर्मा यांनी मांडली,तर सरकारची बाजू एड.आनंद गोदे यांनी मांडली..