The news is by your side.

शेतकऱ्याची एक लाखाची रक्कम लुटणारे गजाआड!

0 6

स्था. गु.शाखेने दोन दिवसात रोकड लुटमारीचा छडा लावला!

अकोला :३०मार्च पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या भंडारज फाट्यावर मळसुर येथील शेतकऱ्याची एक लाखाची रक्कम लुटणारे गजाआड करण्यास अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. स्था.गु. शाखेने घटनेनंतर दोन दिवसातच छडा लावल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की, पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या भंडारज फाट्यावर २६ मार्चच्या रात्री ८वाजता दरम्यान, पातूर तालुक्यातील मळसुर येथील  ४२वर्षीय रहिवासी विलास यशवंत काळे,हे अकोला येथून हरभरा विक्री करून,पातूर कडे जात असताना, चिखलगाव ते भंडारज फाट्या दरम्यान त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले होते.त्यावेळी दोन अज्ञात इसम दुचाकीवरून पातूर कडे जात असताना, काळे यांच्या मदतीसाठी थांबले, त्यानंतर काळे आणि दोन अज्ञात इसम पेट्रोल विकत घेण्यासाठी, फुलारी यांच्या पेट्रोल पंपावर गेले,पेट्रोल घेऊन परत येत असताना, विलास काळे यांच्या कडे,एक लाख रुपयांची रोकड असल्याची बाब लक्षात आल्यावर, त्या दोन इसमांंनी चाकूचा धाक दाखवून, काळे यांचे एक लाख रुपये लुटले आणि पळून गेले.या सर्व प्रकारची तक्रार विलास काळे यांनी२७मार्च रोजी पातूर पोलीस स्टेशनला दीली. त्यावरून पातूर पोलिसांनी ३९२,३४नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाचा तपास स्था. गु.शाखेकडे दिल्यावर, तपासाची चक्रे अधिक गतिमान करून,वाशिम येथील विजय भोलाप्रसाद गुप्ता वय २६ वर्षे आणि लखन अरुण गवळी वय १९वर्षे दोन संशयित तरुणांना ताब्यात घेऊन, त्यांची कसून चौकशी केली असता,त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक एम. एच.३७-झेड-३८०३,एक मोबाईल आणि लुटलेली एक लाखाची रोकड असा एकूण १ लाख५५हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस हे. कॉ. प्रमोद डोईफोडे, अश्विन सिरसाट, शक्ती कांबळे, फिरोजखान, मनोज नागमते, संदीप ताले यांनी केली.