The news is by your side.

हाथरून येथील अवैध पेट्रोल-डिझेल साठ्यावर, दहशतवादी पथकाची धाड!

0 231

हाथरून येथे जप्त केलेल्या पेट्रोल-डिझेल साठ्याचे कनेक्शन गायगावात!

अकोला : ५एप्रिल रोजी दुपारी तीनच्या दरम्यान उर ळ  पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या हाथरून येथून पेट्रोल-डिझेलच्या साठ्यावर, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दहशतवादी विरोधी पथकाला धाड टाकून ५६०लिटर पेट्रोल डिझेलचा साठा जप्त करण्यात यश आले आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पेट्रोल-डिझेल साठ्याचे कनेक्शन गायगाव डेपो परिसरात होणाऱ्या अवैध पेट्रोल-डिझेलच्या धंद्याशी असल्याचे समजते.पोलीस या संदर्भात कोणत्या दिशेने तपास करते,यावरून अनेक बाबींचा उलगडा होणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५एप्रिल रोजी उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे  हाथरून येथे चोरीच्या मार्गाने येत असलेल्या पेट्रोल डिझेलची विक्री होत असल्याची, बरेच दिवसापासून परिसरात चर्चा सुरू होती.त्यावरून दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी सापळा रचून, हाथरून येथील ३०वर्षीय रहिवासी अफसरशाह इस्माईल शाह याच्या मालकीची एम.एच.३०-ए. जी.३४९६ क्रमांकाच्या चारचाकी घरासमोर उभ्या असलेल्या मालवाहक वाहनातून आणि त्याच्या राहत्या घरातून  पेट्रोल डिझेलचा ५६०लिटरचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये३८०लिटर डिझेल आणि १८०लिटर पेट्रोल आणि वर नमूद वाहन असा एकूण५लाख ५२हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अफसरशहा याच्या विरोधात उरळ पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३,७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.

अकोला दहशतवादी विरोधी पथकाने एवढया मोठया प्रमाणात पेट्रोल डिझेलचा साठा जप्त करून,उरळ पोलिसांच्या ताब्यात दिला.हा पेट्रोल-डिझेलचा साठा कोठून आणला,नमूद आरोपी हा किती दिवसापासून हा गोरखधंदा करीत आहे. त्याचे गायगावातील आणि अकोल्यातील पेट्रोल-डिझेल माफियांशी संबंध आहेत का?या दिशेने आरोपीच्या मोबाईलचा कॉल डाटा तपासून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचतील काय?का थातूरमातूर  तपास करून, याच्यावर पडदा पाडतात की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे.