The news is by your side.

कुरुमच्या प्राथमीक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ

0 2

मूर्तिजापूर: सर्वसामान्यांसा’ी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शासन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देते, मात्र मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रचंड प्रमाणात सावळा गोंधळ असल्याचे लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आले. कुरुम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाNया गावातील रुग्णांनी योग्य उपचार व औषधी मिळत नसल्याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्या योगीता मोहन रोकडे यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी सरपंच अतुल वा’, उपसरपंच इम्रानखान, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख, रुग्णकल्याण समितीचे सदस्य सुशील खंडारे व इतरांसमवेत दोन दिवसांपूर्वी या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून औषधाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांना स्टॉक रजिस्टर व उपलब्ध सा’ा यामध्ये मो’्या प्रमाणात तफावत आढळून आली. आय एन एस या सलाईन औषधीची स्टॉक रजिस्टरवर नोंद आढळली नाही, मात्र स्टोअर रुम मध्ये तपासणी केली असता ६ बाँक्स मध्ये १४४ नग आढळले. ८ हजारांची नोंद असलेले ओआरएस पाऊच प्रत्यक्षात १० बाँक्स मध्ये ५ हजार आढळले. डीएनएस आय व्ही ६६९ नगाची नोंद असून २० बाँक्स मध्ये ४८० नग आढळले.आर एल आय व्ही १७९ नगांंची नोंद असून प्रत्यक्षात १४४ नग दिसून आढळले. पुरव’ा करण्यात येणाNया औषधी सा’्याची प्रातीनिधिक स्वरूपात तपासणी केली असता यामध्ये आकडेवारी नुसार अनियमितता आढळली असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.