The news is by your side.

अकोट तालुक्यात सध्या लिलाव न झालेल्या सर्वच रेतीघाटातून अवैधरित्या रेती उत्खनन सुरु

0 7

अकोट: सध्या अकोट तालुक्यात रेतीमाफिया राज सुरु असून अधिकारी आर्थिक देवाणघेवाणीच्या ओझ्याखाली जगत आहेत. यात अधिकारी व रेतीतस्कर मालामाल होत असले तरी शासनाची तिजोरी मात्र खाली होत आहे. या अवैध व्यवसायामुळे शासनाला दररोज कोट्यवधीचे नुकसान होत आहे. ज्या रेती घाटाचा लिलाव झालेला नाहीत त्यामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक जोमात चालू आहे.खुलेआम अवैधरित्या रेती वाहतूक करणा?्या ट्रॅकर, टिप्परकडे कोणतेही अधिकारी ढुंकूनही पाहत नाहीत.अवैधरित्या येणारी रेती शासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाने येते. महसूल विभाग व पोलिस विभागाकडे अवैध रेती वाहतूक करणाNया टिप्परचे नंबर दिले असल्याचे दबक्या आवाजात दलाल सांगतात.यावर नियंत्रणा ठेवण्यासाठी दक्षता समिती गठित असूनसुद्धा समिती सदस्यांच्या आशीर्वादाने चोरट्याने मार्गाने रेती व्यवसाय सुरू आहे. या सर्व प्रकरणात अधिकारी व लोकप्रतिनिधी या कामात गुंतले असल्याने कारवाई नेमकी करायची कोणावर? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेती माफियांना यावर वारंवार कारवाया करण्यात आल्या तरी सुद्धा अवैघ रेताचा उपसा थांबता थांबेना. त्यामुळे याकडे पोलिस अधीक्षक साहेब,जिल्हाधिकारी साहेब लक्ष देणार काय? असा सवाल नागरिकांना पडला आहे.