The news is by your side.

ग्रामीण भागातील बस फेऱ्या चालू करण्याची नागरिकांची मागणी

0 1


अकोट :वाढता कोरोणा विषाणू ला आळा घालण्याकरिता प्रशासना विविध नियमावली करीत आहे.त्यामध्ये  अकोट वरून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बस फेऱ्या कोरोना काळात बंद केल्या मुळे मुंडगाव,वणी वारूळा,कुटासा ,कावसां, तरोडा वरूळ जऊळका या गावातील अधिकारी वर्ग नागरिक. विद्यार्थी, वर्ग यांना ये जा करण्याकरिता खूप त्रास करावा लागत आहे.बस फेऱ्या बंद केल्यामुळे अधिकारी वेळेवर आपल्या कार्यालयात पोहचू शकत नसल्यामुळे वेळेवर योग्य ती सुविधा देऊ शकत नाही.कावसा प्राथमिक केंद्र येथे काही अधिकारी अकोला वरून. ये जा करतात त्यांना येण्या जाण्या करिता बस उपलब्ध नसल्यामुळे कुटासा फाट्यावर ५ की. मी. पायी यावे लागत आहे.तरी लवकरात लवकर ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत चालू  करण्यात यावी.जेणेकरून अधिकारी,सर्वसामान्य नागरिक त्यांचे कामे वेळेवर करू शकणार अशी मागणी नागरिक व अधिकारी वर्ग करीत आहे.