The news is by your side.

पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल ने केला आत्महत्येचा प्रयत्न

0 12

अकोला : अकोल्यातील रेल्वे स्टेशन जवळील महानगर पालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून खदान येथील रहिवासी असलेल्या राजेश अमृतकर या इसमाने स्वतःच्या गळ्याला दोरी बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला.पोलीस कर्मचारी व अग्निशमन कर्मचारी यांच्या सतर्कतेने त्या इसमाचे प्राण वाचले.राजेश अमृतकर हा स्थानिक केबल नेटवर्क मध्ये पत्रकार म्हणून काम करतो.
आत्महत्येचा प्रयत्न त्याने का केला याचे कारण अद्याप कळू शकले नाही.राजेश बुधवारी सकाळी ११ वाजता पासून पाण्याच्या टाकीवर चढला असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.त्यावेळी त्याने गळ्याला एक दोरी बांधून ती त्या टाकीच्या पाईपला बांधलेली होती.त्याने उडी घेतली असता तो दोर तुटून तो खाली पडला त्यामुळे तेथे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन त्यास रुग्णालयात हलविले.हा प्रकार पाहण्यास बघ्यांची गर्दी जमा झाली होती.