The news is by your side.

६ लाख २७ हजार ३७७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

0 2

तेल्हारा:शहरातील गोपाल टॉकीजमागे असलेल्या गोडाऊन जवळील एका दुकानात अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने छापेमारी करून झडती घेतली असता झडतीत ६,२७,३७७ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. आरोपी अर्जुन वरणमल फुलवंदे रा. गोपाल जीन तेल्हारा याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता शासनाने प्रतिबंधित केलेल्या नशाकारक मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखूजन्य सुंगधीत गुटखा पदार्थ विक्रीकरिता बाळगून मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई विलास रमेश पाटील, पोलिस निरीक्षक विशेष पथक पोलिस अधीक्षक कार्यालय अकोला यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.
अवैध गुटखा विक्रीची गोपनीय माहिती अकोला जिल्ह्याच्या विशेष पोलिस पथकाला मिळते. मग स्थानिक पोलिसांना का मिळत नाही असे प्रश्नचिन्ह आता तेल्हाNयातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत. विशेष पथकाचे पोनि विलास हे आपल्या कर्मचाNयांसह दोन पंचासह तेल्हारा परिसरात अवैध धंद्यांवर छापेमारी करण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना तेल्हाNयात प्रतिबंधित गुटखा, सुंगधीत पान मसाला, सुंगधीत तंबाखूची आरोपी विक्री करीत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईत आरोपीच्या दुकानात विविध रंगाचे सुती तसेच प्लॅस्टिकचे असे एकूण १३ पोते ज्यात सुंगधीत सुपारी, सुंगधीत तंबाखू, बहार खानदानी पान मसाला, विमल सुंगधीत सुपारी, विमल सुंगधी पान मसाला, गोवा १००० गुटखा, १२ कट्टे अशा विविध प्रकारचा बेकायदेशीर मुद्देमाल विशेष पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास तेल्हारा पोनि नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात व आदेशाने हेकॉ विश्वनाथ डांगे करीत आहेत.