The news is by your side.

बाधित आणि सामान्य रुग्णांवर एकाच कक्षात उपचार

0 10

सूर्यचंद्र हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार
कोरोना नियमांचे उल्लंघन
हॉस्पिटलची मान्यता रद्दबाबत मनपाची नोटीस

अकोला: येथील सूर्यचंद्र ट्रामाकेअर अ‍ॅन्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णांसोबतच बाधित नसलेल्या रूग्णांवर एकाच कक्षात उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार मनपाच्या तपासणीत उघड झाला. या संदर्भात नोटीस देऊनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आता मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टनुसार हॉस्पिटलची नोंदणी रद्द करण्याबाबतची नोटीस मनपा आयुक्तांनी दिली आहे.
गांधी चौकात असलेल्या सूर्यचंद्र ट्रामाकेअर अ‍ॅन्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याची माहिती मनपा आयुक्तांना मिळाल्यावर त्यांनी ३१ मार्च रोजी या हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी रुग्णालयात अनेक अनियमितता आढळून आल्या. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे एका कक्षात कोरोनाबाधित रुग्णांसोबतच कोरोना नसलेल्या रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे आयुक्तांना दिसून आले. यासह येथे जैविक कचNयाची योग्य विल्हेवाट लावली नसल्याचेही दिसले. रुग्णालयाच्या पायNयांमध्ये पीपीई कीट आढळल्या. सोबतच अति दक्षता कक्षात रुग्ण भरती असतांनाही दवाखान्यामध्ये कोणीही डॉक्टर्स रुग्णांच्या उपचाराकरिता हजर नव्हते.रुग्णालयातील व्यवस्थापकांच्या भरवशावर रुग्णालयाचा कारभार सुरू होता. मनपाची तपासणी चमू पोहोचल्यावर तेथील कार्यरत व्यवस्थापकांनी डॉक्टरांना संपर्क साधला. मात्र, मनपाच्या चमूने तब्बल अर्धा तास प्रतीक्षा करूनही कुणीही वैद्यकीय अधिकारी येथे पोहोचला नाही. मनपा चमूने येथील देयके तपासणी असता त्यातही मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळले. कोरोना प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमिवर शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन होत नसल्याचे येथे आढळून आले. त्यानंतर मनपा प्रशासनाने रुग्णालयाला नोटीस देऊन त्यांची बाजू मांडण्याबाबत निर्देश दिले. मात्र, रुग्णालयाने कुठलेही समाधानकारक उत्तर न दिल्याने मनपा प्रशासनाने आता मनपा आयुक्तांच्या आदेशान्वये शनिवार, १० एप्रिल रोजी सूर्यचंद्र रुग्णालयाला मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टनुसार नोंदणी कायद्यान्वये एक महिन्याच्या आत यासर्व त्रुटींची पूर्तता करण्याकरिता नोटीस दिली असून त्रृटींची पूर्तता न केल्यास सूर्यचंद्र हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.