The news is by your side.

टाकळी पोटे येथील हत्या प्रकरण: आरोपी बापलेकास १६ पर्यंत पीसीआर !

0 1

अकोला: अकोला तालुक्यातील टाकळी पोटे येथील विठ्ठल नथुजी ठाकरे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्री दवणे यांनी दिले.
बोरगाव मंजू पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या टाकळी पोटे शिवारात १२ एप्रिल च्या रात्री विठ्ठल नथुजी ठाकरे या शेतकNयाचा निर्घुण खून करण्यात आला होता. बोरगाव मंजू पोलिसांनी या प्रकरणी योगेश हरिभाऊ जळमकर (२६) हरिभाऊ लक्ष्मण जळमकर (५५) राहणार. टाकळी पोटे या बापलेकास संशयावरून अटक केली. घटनेच्या आधी मृतक आणि आरोपी यांच्यात शेती नावावर करण्याच्या कारणावरून भांडण झाले होते यावेळी आरोपींनी विठ्ठल नथुजी ठाकरे यांना मुंडके तोडून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच हा वाद मिटल्या नंतर दत्ता ठाकरे याने मृतक ला जवळा खुर्द शिवारातील पद्मा बाई राऊत यांच्या शेतावर भुईमुगाची रखवाली करण्यासाठी सोडून दिले होते. यानंतर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी पिता पुत्रास अटक केली. या खून प्रकरणाचा तपास पीएसआय ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सुरू केला आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून मृतक विठ्ठल ठाकरे (४५) यांना अतिशय क्रूरतेने मारले आहे.
या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी कडून गुन्ह्याचा घटनाक्रम निश्चित करणे आहे. शस्त्र आणि कपडे जप्त करणे आहे. या कारणासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची गरज आहे असा युक्तिवाद सरकारी वकील मीनाक्षी बेलसरे व बोरगाव पोलिसांनी
केला. उभयतांच्या युक्तिवादा नंतर न्यायालयाने आरोपींना पी सी आर मंजूर केला.