The news is by your side.

केंद्रीय पथकाने घेतला यंत्रणेचा आढावा ; साधला बाधीतांशी संवाद

0 7

मूर्तिजापूर: कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आसल्यामुळे अकोला जिल्ह्याच्या दौNयावर आलेल्या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने आज मूर्तिजापुरातील कोविड-१९ विरोधी लढ्यासाठी सुसज्ज यंत्रणेचा आढावा घेतला व बाधीतांशी संवाद साधला.
दिल्लीचे डॉ.मनिष चतुर्वेदी व पुद्दुचेरीचे डॉ.महेश बाबु यांच्या केंद्रीय पथकाचे आज सकाळी ११ वाजता येथील एलडीएच (लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालय) मध्ये आगमन झाले. आरोग्य उपसंचालक डॉ.राजकुमार चव्हाण त्यांच्या समवेत होते. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, मुख्याधिकारी विजय लोहकरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.सोनोने, डॉ.राजेंद्र नेमाडे, निवासी नायब तहसीलदार राजु डाबेराव यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर लगेच पथकातील तज्ज्ञ डॉक्टरद्वयांनी एलडीएच मधील डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरला भेट दिली. तेथील यंत्रणेची सखोल चौकशी करून ‘आलबेल’ चा शेरा दिला. त्यानंतर लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण पद्धत, लस कुठे द्यायची, त्याचे परिणाम, नंतर घ्यावयाची काळजी अशा सर्व प्रक्रियेबाबत लसीकरण स्टाफची चाचणी घेऊन समाधान व्यक्त केले. ऑक्सीजन व अन्य व्यवस्था बघून संपूर्ण व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.
ज्या भागात पाच पेक्षा आधिक रूग्ण आढळतात, तो परीसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. अशा सिंधी कॉलनी, प्रतिक नगर, शिवाजी नगर या प्रतिबंधीत क्षेत्रात जाऊन तेथील बाधितांशी या पथकातील डॉक्टरांनी संवाद साधला व त्यांच्या अडचणी, उपचाराबाबत विचारपूस केली. त्यानंतर हेंडजच्या कोरोना केअर सेंटरला भेट देऊन तेथील यंत्रणेची पहाणी करून तिथे क्वारंटाईन असणाNयांशीही संवाद साधला.