The news is by your side.

कोरोना महामारीचा शेतकऱ्यांना मोठा फटका

0 6

आलू,कांदा व लसूण चे भाव कोसळल्याने शेतकरी व व्यावसायिक आर्थिक संकटात


अकोला :- कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेतकरी वर्ग सुद्धा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी आलू, कांदा व लसूण पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली होती.कालांतराने शेतकऱ्यांना या पिकांचे उत्पादन सुद्धा जास्त झाले परंतु,कोरोना चे सावट असल्याने किरकोळ बाजारपेठ बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी होऊ शकली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळू शकला नाही. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांसोबतच ग्राहकांची वर्दळ कोरोना मुळे कमी असल्याने बाजार समिती मधील आलू, कांदा व लसूण चे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहे.आजच्या घडीला बाजार समिती मध्ये आलू चे भाव १०००ते १५०० प्रति क्विंटल,  कांदा ५०० ते १००० प्रति क्विंटल तर  लसूण २५०० ते ६५०० व अद्रक १५०० ते २२०० प्रति क्विंटल प्रमाणे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी भाव कमी असल्याने शेतकऱ्यांसोबतच बाजार पेठ मधील व्यावसायिक सुद्धा आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून आले.पहिलेच सततच्या नापिकी मुळे हवालदिल झालेला शेतकरी आर्थिक विवंचनेतुन बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरीकडे महाभयानक कोरोना महामारीचा उद्रेक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला बाजारपेठ मध्ये भाव मिळू देत नाही त्या मुळे निश्चितच शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा हा शेतकऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणार असे चित्र दिसून येत आहे.राज्यसरकार व जिल्हा प्रशासन शेतकऱ्याच्या हितासाठी आता या कोरोना च्या घडीला काय करते याचीच वाट बळीराजा बघत आहे.