The news is by your side.

शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक..!

0 762

राजकीय वर्तुळात एकच खळबळ..!

अकोट ;अकोट विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांच्या विरूद्ध दि १७ एप्रिल २०२१ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  कार्यालयांमध्ये जावून सहसचिव विनोद रमेश कराळे यांच्यासी कार्यलयात हजर नसल्यावरून वाद घालून अश्लील शिवीगाळ मारहाण करून शासकीय कामात अडथडा निर्माण केल्याच्या फिर्यादीवरून अकोट शहर पोलीसानी शिवसेनेचे आमदार सजंय गावंडे यांच्या विरूद्ध भांदवी कलम ३५३,२९४,३२३,५०६, नुसार गुन्हा नोंदवून अकोट शहर पोलीसानी तत्परता दाखवत अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ ऊडाली आहे.माजी आमदार संजय गावंडे यांना अटक होताच शिवसैनिकानी रोष व्यक्त करीत पोलीस स्टेशन व न्यायलयासमोर मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

आमदार संजय गावंडे हे शेतकऱ्यांचे अडकलेले धनादेश व सहसचिव कार्यलयात हजर नसल्या शेतकऱ्यांना होत असलेला नाहक त्रासा बदल बऱ्याच तक्रारी शिवसेनेचे आमदार संजय गावंडे यांना प्राप्त झाले होत्या त्यावरून विचारणा करायला गेले होते मात्र मारहाण करून शासकीय कामात अडथडा निर्माण केल्याची खोटी असून तक्रार राजकीय हेतुने प्रेरीत असल्याची शिवसैनिकानी दैनिक नवराष्ट्रसी बोलताना व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांनवर होत असलेल्या अन्याय  विरूद्व वेळोवेळी आंदोलन केले आहे. हा ही आंदोलन चा प्रकार असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हे हजर नसतात दि १७ एप्रिल रोजी गेलो असता सचिव हजर नव्हते तेथे सहसचिव हजर झाले त्याना विचारलेल्या प्रश्नाना अरेरावीने उत्तर दिली तसेच ते मद्यंधुद अवस्थेत होतेमाझ्यावरील आरोप खोटे बिन बुडाचे असून राजकीय हेतुने प्रेरीत आहेत शेतकऱ्यांनसाठी यापुढेही आंदोलन सुरूच राहील..!
शिवसेनेचे माजी आमदार  सजंय गावंडे अकोट विधान सभा