The news is by your side.

अकोल्यातील तीन रुग्णालयांना दहा लाखांचा दंड

0 63

अकोला:अकोल्यात कोरोना रुग्णांवर शासनाची कुठलीही परवानगी न घेता उपचार करणाNया तीन रुग्णालयांवर आज महापालिकेने कारवाई केली. या तीन रुग्णालयांकडून दहा लाखांचा दंड वसुल करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच प्रशासनाला संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहेअकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये ३ खाजगी रुग्णालयांनी बिना परवानगीने कोरोना रुग्णांवर उपचार करत असल्याने मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये त्यांच्यावर १० लक्ष रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील राम नगर येथील श्वास रुग्णालय हे डॉ.नरेंद्र सरोदे यांचे रुग्णालय आहे. जिल्हा स्तरीय सुकाणु समितीने तपासणी केली असता सदर हॉस्पीटल अस्थीरोग निदानाचे रुग्णालय आहे. त्यांनी त्यांच्या रुग्णालयात अनाधिकृतरित्या परवानगी न घेता ७ कोरोना संशयीत रुग्णांना भरती केल्याचे आढळून आले. तसेच सदर रुग्णांना नियमांचे उल्लंघन करून रेमडेसीवीर इंजेक्शन सुरू केल्याचे आढळले. त्यांनी नियमांचे पालन न केल्यामुळे २ लक्ष रुपयांची दंड ठोठावण्यात आला आहे.तसेच अकोला महानगरपालिका क्षेत्रातील कौलखेड येथील डॉ.स्वप्नील प्रकाशराव देशमुख, फिनिक्स हॉस्पीटल यांच्या कडे जिल्हा स्तरीय सुकाणु समितीने यांनी तपासणी केली. या रुग्णालयात त्यांनी अनाधिकृतरित्या परवानगी न घेता ९ खाटांवर कोरोना रुग्णांना भरती केल्याचे आढळले. तसेच या रुग्णालयाच्या पॅनलवर कुठलेही तज्ञ डॉक्टर नसतांना कोव्हीड सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना भरती करण्यात आले होते. रूग्णांचे संमती पत्र नसताना नियमांचे उल्लंघन करत रेमडिसीवीरचे इंजेक्शन देण्यात येत असल्याचे आढळून आले. नियमांचे पालन न केल्यामुळे ५ लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच अकोला महानगरपालिका क्षेत्रातील महाजनी प्लॉट येथील डॉ.सागर थोटे, थोटे हॉस्पीटल व चेस्ट क्लिनिक, यांच्याकडे जिल्हा स्तरीय सुकाणु समितीने तपासणी केली. डॉ.थोटे यांनी दुसNया ठिकाणी अनाधिकृतरित्या कोव्हीड केअर सेंटर सुरू करून १३ कोरोना संशयीत रुग्णांना भरती करून नियमांचे उल्लंघन केले. तसेच त्यांनी देखील रेमडिसीवीरचे इंजेक्शन सुरू केल्याचे आढळून आले. त्यांना ३ लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रुग्णालयांनी पंधरा दिवसात दंड न भरल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.