The news is by your side.

दुचाकीचा धक्का लागल्यावरून युवकावर प्राणघातक हल्ला

0 25

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गौरक्षण रोडवर एकमेकांच्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका युवकाने दुसNयावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी गौरक्षण रोडवर घडली. या प्रकरणातील आरोपीस खदान पोलिसांनी काही तासांतच अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.गौरक्षण रोडवरील रहिवासी धीरज इंगळे हा युवक दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला राजदीप डोसे याचा धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातच राजदीप डोसे याने त्याच्याकडे असलेले धारदार शस्त्र धीरज इंगळे यांच्या पोटात खुपसले. या हल्ल्यात धीरज इंगळे गंभीर जखमी झाला असून, त्यास तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.आरोपीच्या शोधासाठी पथक पाठविले.
आरोपी राजदीप डोसे याला काही तासांतच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी धीरज इंगळे याच्या तक्रारीवरून राजदीप डोसेविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.