The news is by your side.

प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने युवकाची आत्महत्या

0 20

अकोला : खदान पोलीस ‘ाण्याच्या हद्दीत असलेल्या गोरक्षण रोडवरील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या युवकाला प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
शहरातील एका फिटनेस सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रीतेश तायडे यांनी गौरक्षण रोडवरील वीज वितरण कंपनीच्या पॉवर हाऊस समोर असलेल्या वैष्णवी अपार्टमेंटमधील एका सदनिकेत मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गा’ून चौकशी केली असता प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने प्रशिक्षक तायडे यांनी ही टोकाची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून, नेमका प्रकार काय याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेचा तपास सुरू केला आहे.