The news is by your side.

शिवसेनेच्या जि.प.सदस्यास मारहाण ; परस्परविरोधी गुन्हा दाखल

0 15

पातूर : तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मळसूर येथे दोन गट एकमेकांना भिडले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी परस्परांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरा सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सस्ती जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य संदीप तुकाराम सरदार यांना शिवीगाळ केली. तसेच पाच जणांनी मारहाण केली. या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी शिवाजी काळे, गौरव काळे, पंढरी गडदे, संतोष काळे, आतीश काळे यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषद सदस्य संदीप सरदार यांच्या गटातील दोघा जणांनी घरात घुसून विनयभंग केल्याची तक्रार महिलेने केला आहे. यावरून जिल्हा परिषद सदस्य संदीप तुकाराम सरदार, प्रमोद मधुकर पवार यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गटांतील एकूण सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा परिषद सदस्याला मारहाण केल्याच्या प्रकरणाचा तपास बाळापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत असून, विनयभंग प्रकरणाचा तपास चान्नी पोलीस करत आहेत.