The news is by your side.

तीन गौवंशांना पोलिसांनी दिले जीवनदान

0 7

अकोट : हिवरखेड पोलीस स्टेशन चे पो.हे.कॉ. संतोष सुरवाडे यांना माहिती मिळाली की हिंगनी बु. परिसरातून अवैध रित्या गौवंश एका गाडीत कत्तलीसाठी कोंबुन नेत आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर यांनी स्टाफ सोबत घेऊन हिंगनी बु. गावाजवळ नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान वाहन क्रमांक श्प् ३० Aँ ३८६७ या वाहनात ३ गौवंश निर्दयतेने कमी जागेत दोरीने बांधून जख्मी होतील अशा पद्धतने कत्तली करीता वाहतूक करतांना पोलिसांना लक्षात आले असता ३ गौवंश कि. ४० हजार आणि वाहन किं. २ लाख असा ऐकून अंदाजे २ लाख ४० हजार रूपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपी वाहन चालक मकसूद खॉ.याकूब खॉ.गौवंश मालक सलिमोददीन ग्यासोद्दीन दोन्ही राहणार हिवरखेड या दोघांविरुद्ध हिवरखेड पोलिस स्टेशन ला प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही हिवरखेड पो.उपनिरीक्षक गोपाल दातीर, पो.हे. कॉ.संतोष सुरवाडे, नीलेश तायडे, गिरधर चव्हाण, पो.कॉ. आकाश राठोड यांनी केली.