The news is by your side.

मशरूम व्यवसायातुन लाखोचा स्वयंमरोजगार

0 166

वाशीम : जीवन जगण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावरच यश मिळते. हे प्रमोद सोनुने आणि कैलास कदम या दोन युवकांनी मशरूम (अळींबी) शेतीतून सिद्ध केले आहे. वाशीम जिल्ह्यातील येथील प्रमोद सोनुने आणि कैलास कदम असे या युवकांचे नाव आहे. दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची. शिक्षण घेत असताना प्रचंड अडचणी यायच्या. शिक्षणासाठी वेळोवेळी पैसा मिळायचा नाही. कसेबसे दोघांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अशातच मशरूम शेती करण्याचे प्रशिक्षण पंचाळ येथील मोरे यांनी माहिती दिली या युवकांना क्षणाचांही विलंब न लावता दोघांनीही वाशिम येथे मशरूम प्लांटचे प्रशिक्षण घेण्याचा विचार मनात पक्का केला. मशरूम तज्ज्ञांकडून सर्व माहिती जाणून घेतली. आधुनिक शेतीचे धडे घेतले. मशरूम लागवड करण्यासाठी उन्ह लागू नये, म्हणून मोठ्या शेडची आवश्यकता होती. प्रमोद सोनुने यांच्याकडे १५०० स्क्वेअर फूट प्लॅट होता तर आम्ही कोणताच विचार न करता प्रमोद सोनुने आणि कैलास कदम यांनी राहत्या घराजवळ मशरूम शेतीसाठी जागा निवडली. मशरूम लागवड करण्यासाठी एका प्लॉस्टिकमध्ये कुटार घेवून एकमेकांवर थर तयार केले. मशरुम २५ ते ४५ दिवसांचे उत्पादन असून तीनदा तोडणी करता येते.

ग्रामीण भागात मशरूमची विशेष मागणी नाही. पण, शहरी भागातील हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये मशरुमला मोठी मागणी आहे. व्यावसायिक हेतू ठेवून दोघांनीही योग्य नियोजन केले. मशरूमचा दर सध्या प्रती किलो २५० रुपये आहे. कमी खर्चात चांगले पीक घेता येते. केवळ पारंपरिक शेती न करताना परसबाग अथवा घरातील एका खोलीच मशरूम शेती सहजपणे करता येते. शासनाने विक्रीची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रमोद सोनुने व कैलास कदम यांनी केली. मशरूम गुणकारी मशरूम (अळींबी) मध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आहेत. मशरूमचा आहारात वापर केल्यास शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गॅस, अ‍ॅसिडीटी दूर करते. मशरूम सेवण केल्याने मधूमेह, रक्तदाब व हृदयविकार नियंत्रणात ठेवता येतो.