The news is by your side.

अरुण जेटली गुन्हेगार आहेत का?

0 22

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले.काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे? एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत. 2019 ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे.विजय मल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, पण विजय मल्ल्या याने लंडन कोर्टात केलेल्या एका वक्तव्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अडचणीत आले आहेत. देश सोडण्यापूर्वी आपण अरुण जेटली यांना भेटलो होतो. या भेटीत आपण बँकेच्या व्यवहाराबाबत तडजोड करण्याविषयी बोललो असा दावा विजय मल्ल्या याने लंडनच्या एका कोर्टात केला. यावर अरुण जेटली यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे कारण काय? पण काँग्रेसने हे केले आहे. हजारो कोटींची कर्जे बुडवून विजय मल्ल्याने देश सोडला आहे. मल्ल्या सध्या लंडन येथे आहे व त्याचे गाठोडे पुन्हा हिंदुस्थानात आणण्यासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात खटला सुरू आहे. अनेक बड्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे घेऊन ती बुडवली आहेत. 16 राष्ट्रीय बँका ‘एनपीए’ग्रस्त आहेत व ही कर्जे घेणारे सर्व बडे उद्योगपती आहेत. त्यातला एक मल्ल्या आहे. मल्ल्याने साधारण 13 हजार कोटींचे कर्ज घेतले व किंगफिशर एअरलाइन्स बुडाल्याने त्याने कर्ज बुडवले. त्याला कर्ज फेडणे शक्य नाही असे तो म्हणाला (अनेक बड्या उद्योगपतींना ते शक्य होत नाही). त्यामुळे ‘वन टाइम सेटलमेंट’चा मार्ग ते स्वीकारतात. मल्ल्याने त्यासाठी प्रयत्न केले, पण बँकांनी ‘सेटलमेंट’ची तडजोड स्वीकारली नाही. ती का स्वीकारली नाही व त्यामागे त्यांचे नेमके राजकीय अर्थमंथन काय होते ते त्यांनाच माहीत. असे म्हणतात की, मल्ल्या कर्जाची मोठी रक्कम परत करायला तयार होता. त्याची संपत्तीही जप्त झाली. शिवाय आता मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकार देशातील आणि विदेशातील न्यायप्रक्रियेसाठी जो मोठा खर्च करीत आहे ते पाहिले तर सरकार उद्योगपतींच्या कर्जाबाबत आतबट्ट्याचाच व्यवहार करीत आहे असे दिसते. कर्ज फेडीन असे सांगणार्‍यांना कर्ज फेडण्याची संधी मिळावी हे अर्थशास्त्र आहे. बँकांनी कर्जे द्यायची, ती बुडवायला पोषक वातावरण निर्माण करायचे व उद्योगपतींना पळवून लावले की पुन्हा त्यांच्या प्रत्यार्पणाचे ढोल वाजवायचे. मल्ल्या हा आता आर्थिक विषय राहिला नसून राजकीय धोपटेगिरीचा विषय झाला आहे. मल्ल्याने आता लंडनच्या कोर्टात सांगितले की, ‘‘बँकांचे आपल्यावर कर्ज होते. थकबाकी भरायला आपण तयार होतो. तडजोडीबाबत मी बँकांना अनेकदा पत्र लिहिले होते, परंतु मला त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकांशी तडजोड करावी यासाठी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती.’’ मल्ल्याच्या या विधानानंतर इतकी खळबळ उडायचे कारण काय? अशा प्रकारच्या भेटी होऊ शकतात व हे काँग्रेसला माहीत असायला हवे. ज्या पक्षात मनमोहन सिंग यांच्यासारखे जोरदार अर्थतज्ञ आहेत त्यांचा सल्ला तरी काँग्रेसने घ्यायला हवा होता. तडजोडीचा मसुदा मल्ल्याने दिला होता व बँकांना तो मान्य नव्हता. त्यामुळे अर्थमंत्र्यांकडे दाद मागितली असे हे प्रकरण आहे. पुन्हा मल्ल्या अर्थमंत्र्यांना भेटला तो संसदेच्या दालनात. मल्ल्या हा खासदार होता व खासदार म्हणून तोसंसदेत कुठेही वावरू शकत होता. संसद सदस्याचा तो हक्क आहे. त्यामुळे संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आपण मल्ल्या याला अरुण जेटली यांच्याशी बोलताना पाहिले होते, म्हणून जेटली हे मल्ल्या प्रकरणातील एक गुन्हेगार आहेत असे जेव्हा काँग्रेसचे एक पुढारी पुनिया सांगतात तेव्हा हसू आवरत नाही. खरे तर काँग्रेस व भाजपने संसदेत ज्या चारित्र्याचे लोक निवडून आणले आहेत ते पाहता मंत्र्यांनी कुणाला भेटायचे व टाळायचे हा एक प्रश्नच आहे. पुन्हा मल्ल्या हा कर्ज बुडवणारा एकटा नाही. संसदेत असे कर्जबाजारी व कर्जबुडवे ‘एक से बढकर एक’ आहेत व ते खासदार म्हणून हवे तेथे फिरत आहेत. नीरव मोदीच्या एका कौटुंबिक सोहळ्यात राहुल गांधी हजर होते असेही समोर आले. म्हणजे मोदी याच्या पलायनामागे राहुल गांधी होते असे मानायचे काय? बोफोर्स प्रकरणात क्वात्रोची पळून गेला. सरकार व सीबीआयची मदत असल्याशिवाय क्वात्रोचीला पळून जाणे शक्यच नव्हते. हा काळा इतिहास सहज पुसला जाणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्या याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे? एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत. 2019 ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे.अग्रलेख : अरुण जेटली गुन्हेगार आहेत काय?केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले.काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे? एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत. 2019 ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे.विजय मल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, पण विजय मल्ल्या याने लंडन कोर्टात केलेल्या एका वक्तव्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अडचणीत आले आहेत. देश सोडण्यापूर्वी आपण अरुण जेटली यांना भेटलो होतो. या भेटीत आपण बँकेच्या व्यवहाराबाबत तडजोड करण्याविषयी बोललो असा दावा विजय मल्ल्या याने लंडनच्या एका कोर्टात केला. यावर अरुण जेटली यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे कारण काय? पण काँग्रेसने हे केले आहे. हजारो कोटींची कर्जे बुडवून विजय मल्ल्याने देश सोडला आहे. मल्ल्या सध्या लंडन येथे आहे व त्याचे गाठोडे पुन्हा हिंदुस्थानात आणण्यासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात खटला सुरू आहे. अनेक बड्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे घेऊन ती बुडवली आहेत. 16 राष्ट्रीय बँका ‘एनपीए’ग्रस्त आहेत व ही कर्जे घेणारे सर्व बडे उद्योगपती आहेत. त्यातला एक मल्ल्या आहे. मल्ल्याने साधारण 13 हजार कोटींचे कर्ज घेतले व किंगफिशर एअरलाइन्स बुडाल्याने त्याने कर्ज बुडवले. त्याला कर्ज फेडणे शक्य नाही असे तो म्हणाला (अनेक बड्या उद्योगपतींना ते शक्य होत नाही). त्यामुळे ‘वन टाइम सेटलमेंट’चा मार्ग ते स्वीकारतात. मल्ल्याने त्यासाठी प्रयत्न केले, पण बँकांनी ‘सेटलमेंट’ची तडजोड स्वीकारली नाही. ती का स्वीकारली नाही व त्यामागे त्यांचे नेमके राजकीय अर्थमंथन काय होते ते त्यांनाच माहीत. असे म्हणतात की, मल्ल्या कर्जाची मोठी रक्कम परत करायला तयार होता. त्याची संपत्तीही जप्त झाली. शिवाय आता मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकार देशातील आणि विदेशातील न्यायप्रक्रियेसाठी जो मोठा खर्च करीत आहे ते पाहिले तर सरकार उद्योगपतींच्या कर्जाबाबत आतबट्ट्याचाच व्यवहार करीत आहे असे दिसते. कर्ज फेडीन असे सांगणार्‍यांना कर्ज फेडण्याची संधी मिळावी हे अर्थशास्त्र आहे. बँकांनी कर्जे द्यायची, ती बुडवायला पोषक वातावरण निर्माण करायचे व उद्योगपतींना पळवून लावले की पुन्हा त्यांच्या प्रत्यार्पणाचे ढोल वाजवायचे. मल्ल्या हा आता आर्थिक विषय राहिला नसून राजकीय धोपटेगिरीचा विषय झाला आहे. मल्ल्याने आता लंडनच्या कोर्टात सांगितले की, ‘‘बँकांचे आपल्यावर कर्ज होते. थकबाकी भरायला आपण तयार होतो. तडजोडीबाबत मी बँकांना अनेकदा पत्र लिहिले होते, परंतु मला त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकांशी तडजोड करावी यासाठी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती.’’ मल्ल्याच्या या विधानानंतर इतकी खळबळ उडायचे कारण काय? अशा प्रकारच्या भेटी होऊ शकतात व हे काँग्रेसला माहीत असायला हवे. ज्या पक्षात मनमोहन सिंग यांच्यासारखे जोरदार अर्थतज्ञ आहेत त्यांचा सल्ला तरी काँग्रेसने घ्यायला हवा होता. तडजोडीचा मसुदा मल्ल्याने दिला होता व बँकांना तो मान्य नव्हता. त्यामुळे अर्थमंत्र्यांकडे दाद मागितली असे हे प्रकरण आहे. पुन्हा मल्ल्या अर्थमंत्र्यांना भेटला तो संसदेच्या दालनात. मल्ल्या हा खासदार होता व खासदार म्हणून तोसंसदेत कुठेही वावरू शकत होता. संसद सदस्याचा तो हक्क आहे. त्यामुळे संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आपण मल्ल्या याला अरुण जेटली यांच्याशी बोलताना पाहिले होते, म्हणून जेटली हे मल्ल्या प्रकरणातील एक गुन्हेगार आहेत असे जेव्हा काँग्रेसचे एक पुढारी पुनिया सांगतात तेव्हा हसू आवरत नाही. खरे तर काँग्रेस व भाजपने संसदेत ज्या चारित्र्याचे लोक निवडून आणले आहेत ते पाहता मंत्र्यांनी कुणाला भेटायचे व टाळायचे हा एक प्रश्नच आहे. पुन्हा मल्ल्या हा कर्ज बुडवणारा एकटा नाही. संसदेत असे कर्जबाजारी व कर्जबुडवे ‘एक से बढकर एक’ आहेत व ते खासदार म्हणून हवे तेथे फिरत आहेत. नीरव मोदीच्या एका कौटुंबिक सोहळ्यात राहुल गांधी हजर होते असेही समोर आले. म्हणजे मोदी याच्या पलायनामागे राहुल गांधी होते असे मानायचे काय? बोफोर्स प्रकरणात क्वात्रोची पळून गेला. सरकार व सीबीआयची मदत असल्याशिवाय क्वात्रोचीला पळून जाणे शक्यच नव्हते. हा काळा इतिहास सहज पुसला जाणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्या याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि मल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे? एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत. 2019 ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे.