The news is by your side.

वाडेगावचे लिंबू जाणार आता विदेशात!

वाडेगाव येथे निर्यातदार व शेतकरी संवाद सभा

0 83

वाडेगाव : वाडेगाव लिंबू उत्पादनाकरिता प्रसिद्ध असून, या उत्पादनातून चांगला फायदा व्हावा याकरिता निर्यातदार व शेतकरी यांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. येथील लिंबूचे उत्पादन दलालामार्फत न विकता थेट निर्यातदार मार्फत लिंबू विदेशात जाणार आहे. हे लिंबू विकताना हिरवा लिंबू घेतील कारण हे विदेशात घेऊन जाताना ८ ते १० दिवस लागतात म्हणून हिरवा लिंबू व त्याचा आकार, दर हे ठरवून शेतकNयांना मोबदला दिला जाणार असल्याचे बैठकीत सांगितले आहे.
यावेळी संवाद सभेचे अध्यक्ष अकोट कृषी विभागाचे एसडीओ अशोकराव कंडारकर, प्रमुख अतिथी म्हणून अकोलाचे उपजिल्हाधिकारी अशोकराव अमानकर, तहसीलदार समाधान सोळंके, रवी काळे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. हिम्मतराव घाटोळ, पंचायत समिती बाळापूरचे माजी सभापती तथा सदस्य प्रशांत मानकर, मोर्ना व्हॅली ?ग्रोचे प्रा.राजदत्त मानकर, निर्यातदार राहुल पासयलकर, डॉ.रहेमान खान, श्यामलाल लोध, जानराव लोणकर, वासुदेवराव फाळके, गणेश कंडरकर, प्रगतशील शेतकरी शिवाजी म्हैसने, बाळू पाटील, विलास वरोकार, संदिप इंगळे, ज्ञानदेवराव वाट, रवी काळे, रवी पोहूरकर, रवी सरप उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.नितीन मानकर, सुश्रुत भुस्कुटे, ज्ञानेश्वर चोपडे, शेख सिकंदर, संतोष मसने, संतोष सरप, मनिष सरप, गजानन मानकर, शशिकांत डांगे, अभिजित घाटोळ, महेंद्र पाटीलखेडे, अनिल कोल्हे, गणेश मानकर,अविनाश देशमुख, स्वप्नील महल्ले, बालाजी देशमुख, विनोद मानकर, अजय अवचार, शेतकरी अनिल बारबुदे यांनी परिश्रम घेतले. संचालन सदानंद कारंजकर यांनी केले तर आभार अविनाश देशमुख यांनी मानले.