The news is by your side.

१०० टक्के सेंद्रिय शेती करणारे जगातले पहिले राज्य ठरले सिक्कीम

0 150

सिक्कीम :भारताच्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याने जगाच्या व्यासपीठावर भारताची मान उंचावली आहे. ६ लाख १० हजार लोकसंख्या असणारे हे राज्य जगातील पहिले १०० टक्के सेंद्रिय शेती करणारे राज्य ठरले असून त्यांना गुरुवारी २५ देशांच्या ५१ नमित धोरणांना मागे टाकल्याबद्दल संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अॅग्रीकलचर ऑरगनायझेशन, वर्ल्ड फ्युचर कौन्सिल आणि एनजीओ आयएफओएएम तर्फे ऑस्कर सुवर्ण पुरस्कार देण्यात आला. ब्राझील, डेन्मार्क व क्वेटो एक्वडोर यांना रजत पुरस्कार मिळाला.सिक्कीमने २००३ साली हृदयविकार धोका कमी करणे, पर्यावरण रक्षण आणि स्वस्थ जीवन यासाठी राज्यात सेंद्रिय शेतीची सुरवात केली होती आणि २०१६ साली पंतप्रधान मोदी यांनी सिक्कीम १०० टक्के सेंद्रिय शेती राज्य बनल्याचे जाहीर केले होते. गेली २५ वर्षे या राज्यात सत्तेवर असलेले पवन चामलिंग इटलीमधील रोम येथे हा पुरस्कार स्वीकारताना म्हणाले, मी शेतीतज्ञ नाही तर राज्याचा नेता आहे. मात्र राज्यात सेंद्रिय शेती साठी आवश्यक त्या सर्व सुविधा आम्ही दिल्या. १०० टक्के शेती सेंद्रिय पद्धतीने करणे शक्य आहे हे आम्ही दाखवून दिले आहे. आमच्यासारखे छोटे राज्य हे करू शकत असेल तर बाकीचेही नक्कीच करू शकतात हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे.