The news is by your side.

एका विधवा शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलेचे मुख्यमंत्र्यांना जाहीर पत्र!

0 71

साहेब, जय महाराष्ट्र!
यवतमाळ जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपण येत आहात आपले मनःपूर्वक स्वागत!
मी इतकी श्रीमंत नाही की, आपल्याला हार-तुरे देईल परंतु कपाळावर असलेल्या काळ्या कुंकवाची शपथ माझ्या पतीची आ’वण करीत मी तुमचे स्वागत करीत आहे. मी या मातीतील आहे, ज्या मातीने एका दाण्यापासून शंभर दाणे बनवले आहेत. मी एका शेतकNयाची विधवा आहे.विशेषत: शेतकNयाने गळफास लावून आत्महत्या केलेल्या शेतकNयाची विधवा पत्नी बोलते!
साहेब खूप झालं, आता काय करावं हे सुचत नाही. वेदना होते ज्या जिल्ह्याची ओळख आज सांस्कृतिक शहर म्हणून असायला पाहिजे होती, त्या जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून निर्माण झाली आहे. याची मला लाज वाटते आणि दु:खही होते. साहेब, पाच वर्षांपूर्वी नवNयालाही न जुमानता मतदानाच्या रांगेत उभे राहून तुमच्या चिखलातून येणाNया कमळाला मो’्या हाताने मी मतदान केलं होतं ,पण त्याचे परिणाम काय झाले काळे कुंकू ?? काय वास्तव्य तुम्ही आमच्यावर आणून ‘ेवले. वाटलं होतं की, गुलामीत जीवन जगत असताना स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या घराच्या दारावर येईल, पण कदाचित हे स्वप्न बघितले होते. मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी गृहिणी होती पण अचानकपणे काय झाल,ं सरकारचे धोरण कसे बदलले ,सरकार ने काय केले आम्हाला कळलंच नाही. माझ्या पतीने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, एवढेच नाही तर माझ्या पतीचे असणारे सहकारी शेतकरी फवारणीला गेले असता विषबाधा होऊन मरण पावले . त्याहीपेक्षा ती माझ्याच शेतकरी जातीची एक शेतकरी महिला स्वतःच सरण रचून घाटंजी तालुक्यामध्ये आत्महत्या करते, सांगा ना साहेब, आमचा काय दोष होता? हा दोष शेतकरी नवरा केला म्हणून?? साहेब की वास्तव भोगताना वेदना होते हो! तुम्ही आज येणार, आम्हाला माहीत आहे की शब्दांच्या दुनियेमध्ये शब्दांवरती प्रेम करणाNया माणसांना शब्दांनीच तुम्ही खेळवत राहणार आणि शब्द देऊन निघून जाणार, पण एवढे मात्र नक्की करा की ,तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात सन्मानाने आमची कु’ेतरी जाणीव ‘ेवा. साहेब, सातवा वेतन दिला, आम्ही काहीच म्हटले नाही,सोळा टक्के आणि दहा टक्के आरक्षण दिले, आम्ही काहीच म्हटले नाही.साहेब, आपणास जसे वाटेल तसा निणNय घ्या, पण पोटाला नका मारू साहेब! घरात गेले की,नजरेत गॅस दिसते,बँकेत गेले की,नोटा दिसते आणि वाढत्या महागाईचा डोंगर, सांगा काय करावे, साहेब एवढे करा. आमच्या समस्या निराकरण करण्याची खात्री द्या. मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा करू शकत नाही. घरामध्ये असलेली चीलीपिली वारंवार माझ्या पतीची आ’वण करतात की , बाबाने का आत्महत्या केली. मी उत्तर सुद्धा देऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना जर युद्धाच्या लढाईवर जायचं असेल तर जाण्याच्या अगोदर सांगण्यात येत होतं की, जाताना कोणत्याही शेतातील पिकाची नासाडी करायची नाही. जर नासाडी केली तर मात्र त्यावेळी तुम्हाला दंड करण्यात येईल . महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ‘ेवून तुम्ही आज सत्तेवर आहात.छत्रपती शिवबांच्या स्वराज्याची शपथ घेऊन तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण करतात .ही काय अवस्था झाली? त्यावेळी पिकांची काळजी घेण्यात येत होती. आमच्या कुंकूवाचा दोष की आपला ?साहेब, सांगा दोष कुणाचा आहे? एकेकाळी वैभव संपन्न असलेल्या महाराष्ट्रामध्ये आज शेतकNयांच्या प्रचंड आत्महत्या होत आहेत. बेरोजगारांना काम दिले जात नाही.अनेक महिलांच्या समस्या आहेत.भर दिवसा बलात्काराचे गुन्हे घडतात. भ्रष्टाचार वाढलेला आहे.सांगा, या राज्यांमध्ये आम्ही सुरक्षित आहोत की, तुम्ही? आपण सुरक्षित आहात .पण जाता जाता तुम्हाला एवढे मात्र निश्चित सांगते की ,ज्या महाराष्ट्रा मध्ये तुम्ही स्वतःच वैभव संपन्न राज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहतात या महाराष्ट्राला एक हाक द्या की, किमान शेतकNयांची परिस्थिती समजून घेतली तरी आपण धन्य व्हाल. साहित्य संमेलनातील किमान परिसंवादामध्ये आम्हाला अश्रूंच्या स्वरूपामध्ये तरी पेश करा, जेणेकरून कागदाचे रकाने भरतील. शब्दांची अनेक प्रकारची सुमने तेव्हाच वाहिल्या जातील जेणेकरून परागकण चाखण्यासा’ी भ्रमर चकरा मारेल. आमचं ही भलं होईल, एवढेच मागतो.
आपली,
शेतकरी विधवा महिला