The news is by your side.

नयनतारा सहगल यांचे विचार परिवर्तन आणि माणूसपणाचे! 

0 59
९२ व्या अ.भा.साहित्य संमेलनाच्या उद्घाटक प्रख्यात भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण संमेलनाच्या आयोजकांनी अचानक रद्द केले, यासंदर्भात वर्तमानपत्र, टीव्ही यावर बातम्या वाचल्या आणि ऐकल्या आणि निशब्द झाले, काही वेळ कळलेच नाही आपण काय ऐकतो आहे. तेव्हा एकच शब्द निषेध……! हो, मी निषेध करते, आयोजकांनी घेतलेल्या निर्णयाचा व महामंडळाचा भूमिकेचा निषेध केलाच पाहिजे.
साहित्यिकाला कुठल्याच सीमारेषा नसतात. त्यांची कोणतीची चौकट आखलेली नसते. म्हणजे विचारांच्या चौकटीत बंदिस्त करता येत नाही. नयनतारा सहगल यांची प्रतिक्रीया व भाषण वाचले, जे सोशल मिडीयावर व्हायरल झाले. एक लक्षात येते. त्यांनी भाषेच्या पलिकडे जाऊन परिवर्तन आणि माणूसपणाचा विचार मांडला आहे.साहित्य संमेलन हा समाजाला दिशा देणारा उत्सव तसाच सृजनांचा सोहळा असतो. परिवर्तन हा संमेलनाचा श्वास आहे. तेव्हा या विचारांची घुसमट होऊ नये, याला विरोध म्हणजे आपण समाजाला मिळणाNया वैचारिक देवाणघेवाणीच्या वाणीचा,r संवादाची हत्या करतो आहोत,  याचे भान समाजाने ठेवायला पाहिजे. हे भान नसणे म्हणजे जगातील प्रत्येक सारस्वतापासून लोकसाहित्यापर्यंतच्या साहित्यिकाचा अपमान आहे.अगोदर खूप आनंद झाला होता भारतीय लेखिका नयनतारा सहगल यवतमाळात येणार म्हणून. खूप मोठी उत्सुकता होती त्यांना  ऐकण्याची आणि पाहण्याची. यवतमाळकरांनी एक विचार गमावला जो समाजाविषयी सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकणारा होता. ही फार मोठी उर्जा मिळणार होती. का विरोध भाषेवरुन? का विरोध सत्य सांगणाNया माणसाला? का विरोध या देशातल्याच (भारतीय) लेखिकेला राज्याचा सीमा ? भारत माझा देश आहे म्हणणाNया आम्ही सारी भारतीय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करायचा चंग बांधला का? या विरोधी भूमिकेला विरोध करीत नाही.भाषा ही संवादासाठी असते. भारत विविध भाषेचा देश आहे. नयनतारा इंग्रजीत लिहितात म्हणून भाषिक विरोध केला. परंतु विरोध करणाNयाची मुले किती मराठी शाळेत पाठवतात? तेव्हा आमची भाषेची अस्मिता कुठे जाते? खेड्यापाडयातील बहुजनांची शिक्षणाची मराठी शाळा बंद पाडण्याचा सरकारी धोरणाच्या विरोधात आम्ही का रस्त्यावर आलो  नाही? भाषेवरून आम्ही आपली वैचारीक दिवाळखोरीचे प्रदर्शन करतो आहोत. नामवंत जेष्ठ जेखिकेला केवळ मराठी नाही म्हणून रान पेटवावे. भाषा या निकषावर नाकारावे. संवाद- सुसंवादा करीता भाषेचाच मोठा वाटा असतो. या करिता भाषेचा अडसर आजपर्यंत आला नाही, आज अचानक का आला? महाराष्ट्राचा इतिहास पाहता असे घडावे, हे लज्जास्पद आहे. यापूर्वी मराठी साहित्य संमेलन पंजाब येथील घुमान येथे झाले. संत नामदेव महाराजाच्या नावाने हे साहित्य संमेलन व्हावे प्रत्येक मराठी माणूस संत नामदेवाचा वारसदार आहे. संत नामदेवाला त्या काळात जो त्रास सहन करावा लागला, त्यांना मायभूमी सोडावी लागली, त्या संत नामदेवांना पंजाबने स्विकारले. गुरू ग्रंथसाहीबा मध्ये नामदेव की वाणी म्हणून त्याची साहित्याला स्थान द्यावे. मग आम्ही का असे वागतो आहोत? संत नामदेवांच्या नावाने गुरूद्वार आहे. आज त्याच पंजाबी अडनावाच्या सहगल (पंजाबी) व्यक्ती करीता आपण काय केले. त्यांनी घुमानचा साहित्य संमेलनात आपले स्वागत करायला नको होते. बडोद्याच्या तर गेल्या वर्षीच्या संमेलनात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी संमेलनाला हजेरी लावली. महाराष्ट्राने इतर भाषेतील साहित्य, साहित्यिक, संत, विचार, परिवर्तन चळवळ, प्रबोधन हे आधी स्विकारले. उदा. स्वामी चक्रधर यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. अनेक उत्कृष्ट ग्रंथ लिळाचरित्रा सारखे निर्माण झालेत. स्वामी चक्रधर गुजराती होते. ते गुजरातवरून महाराष्ट्रात आले.त्यांचे कित्येक अनुयायी महाराष्ट्रात आहेत आणि होतील. महात्मा बसवेश्वरांनी कन्नड भाषेतून जगण्याचे सोपे तत्वज्ञान दिले. कन्नड सह महाराष्ट्राने ते स्विकारले. संत ज्ञानोबा, तुकोबांचे मराठी अभंग वाचत आणि गात असत. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी मराठीसह अनेक भाषांचा नियमित व्यवहारात वापर केला. नयनतारा सहगल यांचे  निमंत्रण रद्द करणे हाच पर्याय आहे का? आयोजकांनी ही भूमिका का घ्यावी याचा बोलवता धनी कोण? आज वाटायला लागले अघोषित आणिबाणी आहे. विचारांची मुस्कटदाबी सुरू आहे.या गेल्या काही वर्षात नरेंद्र दाभोळकर, कॉ.पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येची उदाहरणे आहेत.  काळाच्या पडद्याआड डोकावले तर संत तुकाराम, संत कबीर, भगवान गौतम बुध्द, संत ज्ञानेश्वर, स्वामी चक्रधर. त्या काळात हीच षड्यंत्राची आखणी होती.  विचार दाबण्याचा प्रय्न केला  पण विचार कधीच मरत नसतात. जे चांगले आहे स्विकार्ह आहे ते कापलेल्या खोडाला पुन्हा धुमारे व्हावे तसे होत असते. म्हणून हे महामानव आजही जिवंत आहते. समाजच जिवंत ठेवत असतात. कोणतेही राज्यकर्ते येवो, कीती हुकूमशाही आणोत, अतिरेकी विचारांचा अंत होत असतो. अलीकडे किती धार्मिक द्वेषाचे राजकारण पसरले आहे. विचारवंताचे झालेले खुन, हिंसाचार, जमावाचा हिंसाचार, हल्लेखोरांना सत्याधाNयांचा आशार्वाद, सद्य परिस्थितीची प्रत्येक भारतीयांना लाज वाटायला हवी अशी भावना सहगल यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. किती संवेदनशीलता, सौजन्यता आमची कमी होत आहे का? संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांची भुमिका महत्वाची आहे. त्यांनी हा अपमान समजून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी माणून अध्यक्षपद नाकारून, वास्तवाची बाजु घ्यावी. हा या देशात आर्थिक भ्रष्टाचारा पेक्षा महाभयंकर विचारांचा भ्रष्टाचार वाढत चालला, याला  रोखले पाहिजे. आम्ही खरी लोकशाही जगवली का? खरंच लोकशाही नांदवत आहोत का, ज्याची धुरा आपल्या खांद्यावर आहे. तेव्हा काय उत्तर असेल. माझ्या मनात अनेक विचार, प्रश्न, दाखले येत आहेत. भारतीय कवियत्री अमृता प्रितम यांच्या कवितेचा मराठीतील अनुवादाच्या काही ओळी:
मी माझ्या घरावरचे पाटीवरचे नाव पुसले
माझ्या घराला दिलेले नाव पुसले
पुसत पुसत मी  प्रत्येक घरावरचे नाव पुसले
प्रत्येक वसतीवरच्या पाटीवरचे नाव पुसले
नाव पुसता पुसता गावाबाहेर असलेल्या गावाचे नाव पुसले
आता तुम्ही माझा घराचा पत्ता विचाराल;
तेव्हा खरी लोकशाही जिथे नांदते तिथे
आता माझे घर आहे!
                                                                                                       – प्रा. वर्षा सुरेश निकम
 ( यवतमाळ)