The news is by your side.

डॉ. धनंजय दातार यांचे आज अकोल्यात आगमन

0 33

अकोला: दुसरे अखिल भारतीय वNहाडी साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे दुबईस्थित उद्योजक मसालाविंâग डॉ.धनंजय दातार व सौ.वंदना दातार यांचे उद्या शनिवार दि. १ जुन २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता अकोला शिवणी विमानतळावर आगमन होणार आहे. स्थानिक मराठा मंडळ मंगल कार्यालयात २ व ३ जून २०१९ रोजी आयोजीत असलेल्या दुसNया वNहाडी साहित्य संमेलनाचे डॉ.धनंजय दातार हे स्वागताध्यक्ष आहेत. शनिवारी १ जून रोजी संमेलनाचे उदघाटन झाल्यानंतर डॉ. धनंजय दातार ‘मसालाविंâग आठवणींचा प्रवास’ या त्यांच्या पुस्तकाचे संमेलनात प्रकाशन करण्यात येणार आहे. डॉ.धनंजय दातार यांनी दुबई येथे प्रारंभी एक साधे किराणा दुकान सुरु केले होते. नंतर त्यांनी आपला हा व्यवसाय मसाले व खाद्य पदार्थ विक्रीत परावर्तीत केला. आज ‘अल-अदील’ नावाने त्यांचा हा व्यवसाय जगात व प्रामुख्याने सर्वच आखाती देशामध्ये फोफावला आहे. मसाले व खाद्य पदार्थ विक्रीचे मोठे साखळी सुपरमार्केट त्यांनी आखाती देशांमध्ये निर्माण केले आहे. नूकताच अबूधाबी येथे प्रख्यात सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हस्ते त्यांच्या चाळीसाव्या सुपरमार्केटचे उद्घाटन झाले आहे. किराणा दुकान ते मोठा उद्योग समूह ही त्यांची उद्योगशील वाटचाल युवकांना प्रेरणादायी ठरावी यासाठी रविवार २ जून रोजी दुपारी ४ वाजता संमेलनस्थळीच डॉ.धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. चला हवा येवू द्या या तुफान विनोदी मराठी मालिकेतील सुप्रसिध्द अभिनेते भारत गणेशपूरे हे डॉ.धनंजय दातार यांची मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाला व साहित्य संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.