The news is by your side.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना

0 102

प्रतिनिधी
अकोला: मागील आठवड्यात तेल्हारा तालुक्यातील दहीगाव,थार व कोठा येथे लवरकर पेरणी केलेल्या काही शेतकNयांना कापुस पिकावर पिक फुलोरा अवस्थेत असतांना गुलाबी बोंड अळी चा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे या किडीचा पादुर्भाव पुढील काही दिवसात इतरही भागामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या करिता शेतकNयांनी कापूस पिक नियमित निरीक्षणात ठेऊन सामुहिक रित्या उपयोजना करून या किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे शक्य होईल. शेतकरी बांधवानी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचा प्रादर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात.
कापूस पिक नियमीत निरीक्षणात ठेवावे, कापूस पिकामध्ये निरीक्षणासाठी एकारी दोन कामगंध सापळे व व्यवस्थापनासाठी एकरी आठ कामगंध सापळे शेतामध्ये लावावे. कामगंध सापळया मध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून किटकनाशकाच्या मिश्रित पाण्यात टाकुन नष्ट करावे , कापूस पिकात आढळलेल्या डोम कळया प्रादुर्भाव ग्रस्त पात्या, फुले व बोंडे हाताने तोडून त्यातील अळी सह किटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावे , कापुस पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधक उपाय योजना म्हणून करावी., बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा हेक्टरी एक ते दीड लाख अंडी शेतामध्ये लावावी, या किडीने आर्थकि नुकसान संकेत पातळी ओलाडल्यास म्हणजेच शेतात दहा टक्के कीड ग्रस्त पात्या, फुले व बोंडे आढळल्यास किंवा कामगंध सापळयात आठ ते दहा नर पतंग सतत तीन ते चार दिवस प्रती कामगंध सापळयात असे आढळून आल्यास कोणत्याही एका किटक नाशकाची फवारणी करावी, क्विनॉलफॉस २०ज्ञ् ए एफ २० मिली, थायोडीकार्ब ७५ज्ञ् डब्लू पी २० ग्रॅम , प्रति १० लिटर पाण्या मध्ये मिसळून फवारणी करावी.नोव्हेंबरच्या आधी गुलाबी बोड अळी च्या व्यवस्थापना करिता सिंथेटीक पायरेथ्रोइडचा , सायपर मेथ्रीन , डेल्टामेथ्रीन, इत्यादी किटक नाशकांचा वापर कटाक्षाने टाळावा जेणे करून पांढरी माशीचा उद्रेक होणार नाही. अशा प्रकारच्या उपाययोजना करून शेतकNयांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करावे. असा पिक संरक्षण संदेश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , अकोला यांनी दिलेला आहे.


गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिनींग प्रेसिंगमध्ये स्वच्छता राखण्याचे आदेश
अकोला: गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच उपाययोजनांचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज आदेश जारी करुन जिल्ह्यातील जिनींग प्रेसिंग चालकांना निर्देशित केली की, आपल्या जिनींग प्रेसिंगमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या कपाशीच्या अवशेषांची शुक्रवार, दि. २७ जुलै २०१८ पर्यंत स्वच्छता करावी, जेणे करुन बोंडअळीचा प्रसार होण्यापासून प्रतिबंध करता येईल. दरम्यान, जिनींग प्रेसिंग कारखान्यांनी कपाशीची स्वच्छता केली नसल्याचे आढळल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ मधील तरतुदीनुसार दि. २८ जुलै २०१८ पासून संबंधित जिनींग प्रेसिंग कारखान्यास सिल लावण्यात येईल.